कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या कर्मचाऱ्यांना ऑनलाइन अनेक सेवा पुरवते. ज्याच्या मदतीने तुम्ही घरबसल्या ऑनलाइन सेवांचा लाभ घेऊ शकता. परंतु जर तुम्ही ऑनलाइन सेवा वापरत असाल तर तुम्हाला तुमचा UAN क्रमांक द्यावा लागेल किंवा तुम्ही UAN क्रमांकाने लॉगिन करू शकता. ऑनलाइन सेवांमध्ये, तुम्ही नॉमिनी जोडण्यापासून ते पीएफ बॅलेन्स तपासण्यासाठी वापरू शकता. त्याचप्रमाणे, जर तुम्हाला तुमचे नवीन बँक खाते अपडेट करायचे असेल तर तुम्ही UAN नंबरच्या मदतीने ते अपडेट करू शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

UAN च्या मदतीने तुम्ही ऑफिसमध्ये न जाता अनेक गोष्टी करू शकता. हे पीएफ खातेधारकांना त्यांच्या पेन्शन निधीच्या तपशीलांमध्ये एकाच ठिकाणी प्रवेश करू देते, पीएफ खात्याशी संबंधित त्यांचे सर्व व्यवहार ट्रॅक करू शकतात. एवढेच नाही तर ते खात्याशी जोडलेले बँक तपशील देखील अपडेट करू शकतात. त्याच वेळी, ईपीएफ पोर्टलच्या मदतीने तुम्ही तुमच्या खात्याचे ई-पासबुक देखील तपासू शकता. तथापि, जर तुम्हाला पीएफ खात्यात नवीन बँक खाते जोडायचे असेल किंवा अपडेट करायचे असेल तर तुम्हाला या प्रक्रिया माहित असणे आवश्यक आहे.

(हे ही वाचा: बनावट पेटीएम अॅपपासून सावधान! प्रॉक्सी पेमेंट App वापरून केली फसवणूक; Video Viral)

काय आहे प्रक्रिया?

१. सर्व प्रथम EFPO च्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करा.

२. नंतर वरच्या मेनूवर, ‘Manage’ टॅबवर क्लिक करा.

३. आता ड्रॉप-डाउन मेनूमधून ‘KYC’ पर्याय निवडा आणि नंतर दस्तऐवज प्रकार म्हणून ‘बँक’ निवडा.

४. त्यानंतर IFSC कोडसह नवीन बँक खात्याची माहिती प्रविष्ट करा.

(हे ही वाचा: LIC च्या ‘या’ योजनेत आहे दुहेरी फायदा! बचतीसह मिळेलं जीवन विम्याचा लाभ; जाणून घ्या तपशील)

५. बँक तपशील अपडेट केल्यानंतर, ‘सेव्ह’ पर्यायावर क्लिक करा.

६. अपडेट केलेले तपशील आता केवायसी प्रलंबित मंजुरी विभागात दिसून येतील.

७. तुमच्या नियोक्त्याला आवश्यक कागदपत्रे द्या. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांची पडताळणी बँकेकडूनच डिजिटल माध्यमातून केली जाते.

८. केवायसी पडताळणी पूर्ण झाल्यावर, तुमची सेवा विनंती स्थिती डिजिटली स्वीकारलेल्या केवायसीमध्ये रूपांतरित केली जाईल.

९. जर नियोक्ता किंवा एसबीआयने बँकेच्या तपशीलांची पडताळणी केली, तर EPFO ​​एक पुष्टीकरण संदेश पाठवते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Epfo update your new bank account online with the help of uan learn the process ttg