आयफोन आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांनी त्यांच्या फोनसाठी वेगवेगळे चार्जर वापरावे लागतात. त्यामुळे फोन चार्जिंग करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. याबाबतच्या अनेक तक्रारी समोर आल्या आहेत. यासाठी युरोपियन युनियन देश वर्षाच्या अखेरीस मोबाइल फोन, टॅब्लेट आणि हेडफोनसाठी एकाच चार्जिंग पोर्टवर करार करण्याची शक्यता आहे. याबाबती माहिती एका खासदाराने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला मंगळवारी दिली. युरोपियन कमिशनने दशकापूर्वी सिंगल मोबाइल चार्जिंग पोर्ट ब्रॉच केले होते. परंतु गेल्या वर्षी कंपन्यांनी सामायिक समाधानावर सहमती दर्शविण्यास असमर्थता दाखवल्याने जगातील पहिल्या कायद्याचा मसुदा प्रस्तावित केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास Samsung आणि Huawei आणि इतर डिव्हाइस निर्मात्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर या प्रस्तावावर आयफोन निर्माता अॅप्पलने जोरदार टीका केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा