iPhone Charging Tips: हल्ली लोकाना फास्ट चार्जिंग मोबाईल हवे आहेत. अनेक स्मार्टफोन युजर्स फार वेळ फोन स्वतःपासून लांब ठेवू शकत नाहीत किंवा फोन चार्ज करणं विसरतात. त्यामुळे बहुतांश लोकांना मोठी बॅटरी असणारे आणि फास्ट चार्ज होणारे स्मार्टफोन हवे असतात. जर तुमच्याकडे आयफोन Iphone असेल आणि हा आयफोन जुना असेल तर आता याच्या चार्जिंगची तुम्ही काळजी करु नका आम्ही तुमच्यासाठी काही सोप्या ट्रिक्स घेऊन आले आहोत, ज्यामुळे तुमचा आयफोन तुम्ही झटक्यात चार्ज करु शकणार आहात.
‘या’ पद्धतीने करा झटक्यात आयफोन चार्ज
१.पर्यावरण रक्षणाचे कारण देत आयफोनने आपल्या फोनसह चार्जर देणे बंद केले. तुम्ही Apple चा शिफारस केलेले चार्जर किंवा फक्त iPhone चा चार्जर वापरावा.
आयफोन चार्जिंगला लावण्यापूर्वी सर्वप्रथम तो बंद करा. यामुळे तुमचा आयफोन लवकर चार्ज होईल.
(हे ही वाचा : Jio Happy New Offer 2023: नवीन वर्षाच्या मुहूर्तावर जिओने तुमच्यासाठी आणलयं ‘हे’ भन्नाट गिफ्ट )
२.आयफोनला कमी प्रकाश मोड किंवा गडद मोडमध्ये ठेवून चार्ज करू शकता. तसेच तुम्ही बॅटरीचा वापर कमी करण्यासाठी ब्राइटनेस देखील कमी करू शकता.
३. तुमचा आयफोन चार्जिंगवर ठेवण्यापूर्वी तुम्ही बॅकग्राउंडमध्ये चालणारे अॅप्स बंद केले तर ते फोन लवकर चार्ज होईल.
४.फ्लाइट मोडवर चार्जिंग हा देखील एक चांगला पर्याय आहे. जर बॅटरी कमी झाली तर चार्जिंग जलद होईल.