संगणक, स्मार्टफोन, लॅपटॉप आदी डिव्हाइसवर आपली बरीच कामे अवलंबून असतात. पण, या डिव्हाइसवर काही शॉर्टकट कीजसुद्धा असतात, ज्या काम करताना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. या शॉर्टकट कीज माहिती असतील तर काम आणखीन सोपे आणि जलद होण्यास मदत होते. तर आज आपण संगणक आणि लॅपटॉपवर काम करताना कोणत्या शॉर्टकीज वापरायच्या याची यादी पाहू.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खास शॉर्टकट की आणि त्यांच्या वापराविषयी सविस्तर जाणून घेऊया :

नवीन टॅब ओपन करा (Open a new tab) :

नवीन टॅब उघडण्यासाठी आपल्यापैकी बरेच जण दिवसातून अनेक वेळा माउसचा वापर करतात. पण, यासाठी तुम्ही माउसचा वापर न करता Ctrl + T हा शॉर्टकट वापरू शकता. असे केल्याने ॲड्रेस बारवर आपोआप फोकस होतो आणि नवीन टॅब तुमच्या स्क्रीनवर दिसतो.

टॅब पुन्हा उघडा (Reopen the last closed tab) :

तुम्ही काम करत असताना चुकून एखादा महत्त्वाचा टॅब बंद झाला, तर तुम्ही ‘ Ctrl+ Shift + T ‘ कॉम्बो वापरून चुकून बंद झालेला टॅब पुन्हा ओपन करू शकता.

हेही वाचा…रिअलमी १२ प्रो सीरिज भारतात लाँच! युजर्सना स्टोरेज अन् रंगांमध्ये दिले जाणार ‘असे’ पर्याय; किंमत…

नवीन विंडो उघडा ( Open a new window ) :

‘Ctrl + N’ हा शॉर्टकट वापरा आणि नवीन विंडो ओपन करा. तुम्ही नवीन टॅब उघडता त्याप्रमाणे, टायपिंग कर्सर आपोआप ॲड्रेस बारवर फोकस करतो, ज्यामुळे तुम्हाला काहीही शोधण्याची गरज भासत नाही.

टॅब स्विच करा (Switch between tabs):

काम करताना आपण एकापेक्षा अधिक टॅब उघडून ठेवतो. पण, या छोट्या छोट्या टॅबवर क्लिक करणे कठीण होऊन जाते. जर तुम्हाला माउसचा वापर करून नेव्हिगेट करणे कठीण वाटत असेल, तर पुढील टॅबवर जाण्यासाठी ‘Ctrl + Tab’ शॉर्टकट दाबा किंवा मागच्या टॅबवर येण्यासाठी ‘Ctrl + Shift + Tab’ वापरा.

तुम्हाला एखादी माहिती शोधायची आहे, पण तुमचा ब्राउझर त्याला प्रतिसाद देत नसेल तर Ctrl + Shift + N शॉर्टकट वापरा. तुमच्यासमोर एक गुप्त सर्च बार उघडेल, तिथे तुम्ही सर्च करा. गूगल क्रोम, मायक्रोसॉफ्ट एड्ज या शॉर्टकटचा उपयोग करू शकतात. तुम्ही फायरफॉक्स वापरत असल्यास, ‘Ctrl + Shift + P’ हा शॉर्टकट वापरा. तर या शॉर्टकटचा वापर करून तुम्हीदेखील तुमचे काम आणखीन सोपे करा.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Everyone should know keyboard shortcut keys provide easier method of using devices programs asp
Show comments