फेसबूक आणि इन्स्टाग्राम हे मेटाचे लोकप्रिय प्लॅटफॉर्म्स आहेत. जगभरात या दोन्ही प्लॅटफॉर्म्सचे असंख्य युजर्स आहेत. मेटाकडुन युजर्सना अधिक आकर्षित करण्यासाठी सतत नवनवे फीचर्स लाँच केले जातात. या नव्या फीचर्स मधून युजर्सचा वापर आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. असेच एक नवे फीचर मेटाकडून लवकरच लाँच करण्यात येणार आहे. या नव्या फीचरमुळे इन्स्टाग्राम आणि फेसबूक एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होणार आहे.
कंपनीकडून या नव्या फीचरबद्दल माहिती देण्यात आली. सध्या या नव्या फीचरवर काम सुरू असल्याचे कंपनीने सांगितले. काय असणार आहे हे नवे फीचर जाणून घ्या.
फेसबूक आणि इन्स्टाग्राम अकाउंटमध्ये करता येणार स्विच
- या नव्या फीचरमुळे इन्स्टाग्राम आणि फेसबूक अकाउंटमध्ये स्विच करता येणार आहे.
- यासाठी युजर्सना दोन्ही अकाउंट एकमेकांना लिंक करावे लागतील. अकाउंट लिंक झाल्यानंतर युजर्स सहजरित्या दोन्ही अकाउंट स्विच करून वापरू शकतील.
- यामध्ये युजर्सना एकावेळी दोन्ही अकाउंटचे नोटिफिकेशन मिळतील. एकापेक्षा जास्त अकाउंट असणाऱ्यांना देखील हे वापरता येईल.
या फीचरसह मेटाने युजर्स रेजिस्ट्रेशन प्रोसेसला पण मॉडीफाय केले आहे. त्यामुळे युजर्सना लॉग इन करणे किंवा नवीन अकाउंट सुरू करणे अधिक सोप्पे झाले आहे. म्हणजे या नव्या फीचरमुळे एखाद्या व्यक्तीचे फक्त फेसबूकवर अकाउंट असेल तर इन्स्टाग्रामवर सहजरित्या नवे अकाउंट उघडता येईल.