फेसबुक हे मेटाचे एक लोकप्रिय माध्यम आहे. त्यामुळे कंपनीसुद्धा युजर्ससाठी नवनवीन फीचर घेऊन येत असते. फेसबुक ॲप तुम्ही पूर्वी पोस्ट केलेले जुने फोटो, तुम्ही फेसबुकवर किती वर्षांपासून एकमेकांचे मित्र (फ्रेंड्स) आहात हेसुद्धा वेळोवेळी दर्शवते. तर अनेकदा फेसबुकवर एखादा फोटो किंवा मजकूर लिहिताना आपल्याकडून चुकून पोस्ट डिलीट होते. तर अशा वेळी काय करायचे, असा प्रश्न अनेक युजर्सना पडतो. तर तर या डिलीट केलेल्या पोस्ट फेसबुकच्या एका फोल्डरमध्ये जातात; ज्या तुम्ही सहज मिळवू शकता.
फेसबुकवर डिलीट केलेल्या पोस्ट पुन्हा कशा रिस्टोअर करायच्या ते पाहू…
१. तुमच्या फोनवर फेसबुक ॲप उघडा किंवा डेस्कटॉपवर फेसबुक डॉट कॉम (Facebook. com)वर नेव्हिगेट करा.
२. तुमच्या प्रोफाइलवर जा आणि मेन्यू हा पर्याय निवडा.
३. मेन्यूमधील ‘Archive’ हा पर्याय निवडा.
४. ‘ट्रॅश’ किंवा ‘रीसायकल बिन’ पर्याय निवडा.
५. येथे तुम्हाला तुमच्या अलीकडे डिलीट केलेल्या सर्व पोस्ट सापडतील. तुम्हाला कोणती पोस्ट रीस्टोअर करायची आहे ते निवडा.
६. ‘रीस्टोअर’ (Restore) बटण दाबा आणि पोस्ट आपल्या प्रोफाइलवर ती पोस्ट परत आणण्यासाठी Revive करा.
हेही वाचा…सहा महिन्यांपर्यंत Call History चेक करायची आहे ? फॉलो करा ‘या’ सोप्या स्टेप्स…
तसेच तुम्ही डिलीट केलेली फेसबुक पोस्ट पुन्हा रीस्टोअर करण्यासाठी कंपनी तुम्हाला ३० दिवसांचा कालावधी देते. कारण- ३० दिवसांनंतर या पोस्ट तुम्हाला रीस्टोअर करता येणार नाही. अशा सोप्या पद्धतीत तुम्ही तुमची डिलीट झालेली फेसबुक पोस्ट सहज मिळवू शकता.