फेसबुक वापरकर्त्यांनी आपल्या फॉलोअर्सची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण फेसबुकवर बगचा हल्ला झाला आहे. फेसबुकमधील बगमुळे लाखो लोकांचे फॉलोअर्स रातोरात गायब झाले आहेत. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग देखील यातून सुटलेले नसून मार्क झुकरबर्गचे केवळ ९,९९३ फॉलोअर्स उरले आहेत. बनावट फॉलोअर्सच्या छाटणीचा हा परिणाम असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे मार्क झुकरबर्गचे सर्व फॉलोअर्सही बनावट होते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
हा बनावट फॉलोअर्सच्या छाटणीचा परिणाम असून इतर अनेक वापरकर्त्यांनी देखील अचानक फॉलोअर्स गमावल्याबद्दल तक्रार केली आहे. ज्यामुळे लोकांचे फॉलोअर्स रातोरात गायब झाले आहेत. याआधी कंपनीने सांगितले होते की, सुमारे १० लाख फेसबुक युजर्सच्या यूजरनेम आणि पासवर्डशी छेडछाड करण्यात आली आहे. अशा युजर्सना लवकरच याबाबत माहिती दिली जाईल, असे मेटाने म्हटले होते.
आणखी वाचा : व्हा सावधान! 5G अपग्रेड सारखं तुम्ही ही राहा अपडेट; नाहीतर बँक खाते रिकामे झाल्याचा येईल मेसेज…
मेटाने सांगितले होते की, ‘या वर्षी आम्ही iOS आणि Android वर ४०० हून अधिक दुर्भावनापूर्ण अॅप्स ओळखले आहेत. हे अॅप्स इंटरनेट वापरकर्त्यांना लक्ष्य करतात आणि त्यांची लॉगिन माहिती चोरतात. हे अॅप्स फोटो जाहिराती, मोबाईल गेम्स आणि हेल्थ ट्रॅकर्स यांसारख्या श्रेणींमध्ये होते. यापैकी काही अॅप्स अॅपल आणि गुगलच्या सॉफ्टवेअर स्टोअरमधून डाउनलोड करण्यात आले होते’. याबाबत मेटाने दोन्ही कंपन्यांना माहिती दिली आहे.
दरम्यान, मेटा चे प्रवक्ते म्हणाले, “आम्हाला माहिती आहे की त्यांच्या फेसबुक प्रोफाइलवर काही लोकांच्या फॉलोअर्सची संख्या सतत कमी होत आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर ते सामान्य होण्यासाठी काम करत आहोत. या गैरसोयीबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.