आयटी आणि टेक कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या विक्रीमुळे फेसबुकला मोठा तोटा सहन करावा लागला आहे. गेल्या एका महिन्यात फेसबुकची मूळ कंपनी Meta Platforms Inc च्या स्टॉकमध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे कंपनीचा मेटा एमसीकॅप झपाट्याने खाली आला आहे आणि म्हणून कंपनीला टॉप १० कंपन्यांच्या यादीतून बाहेरचा मार्ग पाहावा लागला आहे.
एकेकाळी सहाव्या क्रमांकावर होती कंपनी
ब्लूमबर्गच्या डेटानुसार, गुरुवारी बाजार बंद झाला तेव्हा फेसबुकच्या मूळ कंपनीचा एमकॅप $ 565 अब्जपर्यंत घसरला. अशाप्रकारे मेटा कंपनी टॉप १० मधून बाहेर पडली आणि Tencent Holdings Ltd नंतर ११ व्या स्थानावर आली. एकेकाळी Meta Platforms च्या mcap ने $०१ ट्रिलियनचा टप्पा ओलांडला होता आणि ती जगातील सहावी सर्वात मूल्यवान कंपनी होती.
(हे ही वाचा: Jio Recharge Plan: ‘हा’ प्लॅन झाला १०० रुपयांनी स्वस्त! सोबत मिळणार अनेक फायदे)
फेसबुकचे एमकॅप आले निम्म्यावर
मेटाचा एमकॅप गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये शिखरावर होता. तेव्हापासून कंपनीचे मूल्य जवळपास निम्म्यावर आले आहे. कंपनीला mcap मध्ये $500 बिलियन पेक्षा जास्त तोटा झाला आहे. कंपनीचे नुकतेच मार्क झुकरबर्गच्या मेटाव्हर्स प्लॅनच्या संदर्भात पुनर्ब्रँड केले गेले आहे आणि मूळ कंपनीचे नाव फेसबुकऐवजी मेटा असे बदलण्यात आले आहे. दैनंदिन सक्रिय जागतिक वापरकर्त्यांच्या संख्येत प्रथमच घट झाल्यामुळे कंपनीला बाजारातील प्रतिकूल परिस्थितीचाही सामना करावा लागत आहे.
(हे ही वाचा: Infinix Zero 5G स्मार्टफोनचा आज पहिला सेल, मोठ्या सवलतीसह उपलब्ध)
‘या’ कंपन्यांचा टॉप ५ मध्ये आहे समावेश
ब्लूमबर्ग डेटानुसार, अॅपल सध्या $२.८ ट्रिलियनच्या मुल्यांकनासह जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. यानंतर मायक्रोसॉफ्टचा क्रमांक लागतो, ज्याची किंमत सध्या $२.२ ट्रिलियन आहे. सौदी अरेबियाची तेल कंपनी अरामको ही $२ ट्रिलियनच्या एमकॅपसह जगातील तिसरी सर्वात मूल्यवान कंपनी आहे. त्यानंतर गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट $१.८ ट्रिलियन आणि अॅमेझॉन $१.६ ट्रिलियन आहे.