Facebook Logo : मेटा समूहाच्या फेसबूक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा लोगो शनिवारी अचानक बदलला गेला होता. काळ्या बॅकग्राऊंडवर पूर्वीचा निळ्या एफ आकाराचा लोगो फेसबूक अॅपवर दिसत होता. त्यामुळे फेसबूकने लोगो बदलला की काय अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. दरम्यान, याप्रकरणी फेसबूकने आता स्पष्टीकरण दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिझनेस इनसाइडरच्या एका अहवालानुसार मेटाने सांगितलं की ही एक तांत्रिक चूक होती. त्याचे निराकारण करण्यात आले आहे. वापरकर्त्यांनी त्यांचा ॲप अपडेट केला तर त्यांना मूळ लोगो दिसू शकणार आहे.

फेसबूकचा लोगो बदलल्यानंतर फेसबूक, ट्विटरवर तक्रारींचा पाऊस पडला. फेसबूकने लोगो बदलला का? या प्रश्नासह फेसबूककडून रिब्रॅन्डिग केली जात असल्याचंही म्हटलं गेलं. तर काहींना वाटलं की नव्या बदलाचा हा एक केवळ टिझर असू शकतो.

फेसबूक अपडेट करण्याचं आवाहन

दरम्यान, प्रत्येक वापरकर्त्याला हा बदलेला लोगो दिसला नाही. सोशल मीडियावर यासंदर्भात जेव्हा चर्चा सुरू झाली तेव्हा अनेकांनी तत्काळ त्यांच्या फेसबूक अॅपल असलेला लोगो तपासला. परंतु, त्यांचा लोगो व्यवस्थित होता. त्यामुळे ही समस्या जागतिक स्तरावरची नव्हती. ही तांत्रिक चूक आता सुधारण्यात आली असून वापरकर्त्यांनी ॲप अपडेट केल्यानंतर त्यांना फेसबूकचा मूळ लोगो दिसू शकणार आहे.

हेही वाचा >> भारतात टेलीग्राम बंद होणार? पावेल ड्युराव यांच्या अटकेनंतर भारत सरकारकडूनही तपास?

मेटा समूहाच्या फेसबूक आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया ॲप्स आणिव्हॉट्सॲप या मेसेजिंग ॲपवर सातत्याने बदल होत असतात. तर कधीकधी प्रायोगिक तत्त्वावरही बदल केले जातात. त्यामुळे यावेळीही मेटाकडून असंच काहीतरी झालं असण्याची शक्यता होती. पंरतु, त्यांनी ही तांत्रिक बिघाड असल्याचं सांगितलं.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्वाचा आदेश दिला. बलात्कार प्रकरणातील पीडितेची सर्व छायाचित्रे सोशल मीडियावरून हटवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. आदेशानुसार, बलात्कार पीडितेची ओळख सार्वजनिक करता येणार नाही. मात्र, असं असतानाही पीडितेचे छायाचित्र फेसबुक, इन्स्टाग्रामसह सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कसे गेले? हे ताबडतोब हटवण्यात यावे, असे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook logo changed trending in twitter meta clarify its technical glitch sgk