फेसबुक मॅसेंजरवर नुकतेच काही फिचर्स देण्यात आले आहेत. यात एंड टू एंड एन्क्रिप्शन, स्क्रिन शॉट डिटेक्शन, मॅसेज रिअॅक्शन, टायपिंग इंडिकेटर यांचा समावेश आहे. एंड टू एंड एन्क्रिप्टेड चॅट आणि स्क्रिनशॉट डिटेक्शन हे दोन खास फिचर्स आहेत. या फिचर्सची युजर्स गेल्या काही दिवसांपासून वाट पाहात होते. लवकरच हे फिचर्स व्हॉट्सअॅपवर उपलब्ध होतील, असंही सांगण्यात येत आहे. मॅसेंजरसाठी नवीन फीचर्स लाँच करण्याबाबत बोलताना, मॅसेंजरचे प्रोडक्ट मॅनेजर टिमोथी बक यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये सांगितले की, “आज आम्ही मॅसेंजरच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड चॅटच्या अपडेटची घोषणा करत आहोत. यामुळे युजर्सचा मॅसेजिंग अनुभव सुधारण्यास मदत होईल. मजेदार, सुरक्षित आणि परस्परसंवादी वैशिष्ट्ये तयार करण्यासाठी वेळ लागतो. पण त्यात अपडेट करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत. या नव्या फिचर्समुळे खासगी संवाद आणखी सुरक्षित होणार आहे.”
एंड टू एंड एन्क्रिप्टेड मँसेंजर
मॅसेंजर अॅप एंड-टू-एंड एनक्रिप्टेड असेल. गेल्या वर्षी फेसबुकने व्हॉईस कॉल आणि व्हिडिओ कॉलसह ग्रुप चॅटसाठी एंड टू एंड एन्क्रिप्शनची चाचणी सुरू केली. आता एन्ड टू एंड एन्क्रिप्शन फिचर्स सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. फेसबुक व्यतिरिक्त एंड टू एंड एन्क्रिप्शनचा दावा करणारे दुसरे मेटा प्रोप्रायटरी अॅप म्हणजे व्हॉट्सअॅप.
स्क्रिन डिटेक्शन फिचर
मेसेंजरला मिळालेले आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्क्रीनशॉट घेतल्याचं नोटीफिकेशन. याच्या मदतीने मॅसेंजर यूजरला आपल्या तात्पुरत्या मॅसेजचा कुणी स्क्रिनशॉट घेतला हे लगेच नोटीफिकेशनद्वारे कळणार आहे. फेसबुक पुढील काही आठवड्यांत एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड चॅट मॅसेजसाठी ही सुविधा देणार आहे. दुसरीकडे व्हॉट्सअॅप यूजर्स या फीचरची अनेक दिवसांपासून मागणी करत आहेत.
YouTube Shorts: लवकरच व्हॉइस ओव्हरचं फिचर मिळणार!; कंपनीकडून चाचणी सुरु
मॅसेज रिअॅक्शन फिचर
मॅसेंजरला मिळालेले तिसरे सर्वात आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे मॅसेज रिअॅक्शन. या फिचरची व्हॉट्सअॅपवर देखील चाचणी सुरु आहे. या वैशिष्ट्यासह, युजर्स प्रतिक्रिया देण्यासाठी संदेशावर टॅप करून आवडीची प्रतिक्रिया तयार करू शकतील. हे वैशिष्ट्य iMessage मध्ये उपलब्ध आहे, आणि व्हॉट्सअॅपवर लवकरच येणार आहे. मॅसेंजर वापरकर्ते त्यांच्या एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड चॅटमध्ये कोणत्याही विशिष्ट संदेशाला उत्तर देऊ शकतील. याशिवाय, एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड चॅटला एक व्हेरिफाईड बॅज देखील मिळेल, जो लोकांना अस्सल आणि बनावट खात्यांमध्ये फरक करण्यास मदत करेल. हे वैशिष्ट्य येत्या आठवड्यात मेसेंजरसाठी आणले जाईल.