Meta to Layoffs 10000 Employees: सध्या जगभरामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदी मुळे आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहे. सध्या सर्वत्रच कर्मचारी कपातीचे वारे वाहत आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple , Amazon, Microsoft and Google parent, Alphabetआघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. मात्र फेसबुकचची मूळ कंपनी मेटा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मेटाने या आधीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे आणि पुन्हा एकदा या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे. या फेरीमध्ये किती कर्मचाऱ्यांची कपात होणार आहे आणि सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांनी कमर्चाऱ्यांना काय म्हटले आहे ते जाणून घेऊयात.
Instagram, WhatsApp आणि Facebook ची पॅरेंट कंपनी असलेल्या Meta कंपनीने पुन्हा एकदा टाळेबंदीची घोषणा केली आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, मेटा पुन्हा एकदा आपल्या १०,००० पेक्षा अधिक कमर्चाऱ्यांना कामावरून काढण्याची घोषणा केली आहे. ही या कंपनीतील टाळेबंदीची दुसरी फेरी असणार आहे. याआधी मेटाने नोव्हेंबर २०२२ मध्ये पहिल्या फेरीमध्ये ११,००० कमर्चाऱ्यांची कपात केली होती.
हेही वाचा : Meta चा मोठा निर्णय! खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी टाळेबंदीनंतर ‘या’ कंपनीची करणार विक्री
मार्क झुकरबर्ग यांचा कर्मचाऱ्यांना मेसेज
मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्गने आपल्या कर्मचाऱ्यांना दिलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे की, आम्ही आमच्या टीमची संख्या १०,००० ने कमी करणार आहोत. यासोबतच ज्यांच्यासाठी आजवर भरती करण्यात आलेली नाही, अशी ५ हजार पदे रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पुढे त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना केलेल्या मेसेजमध्ये म्हटले की, आपल्या सर्वांना यासाठी तयार राहिले पाहिजे कारण आर्थिक मंदी पुढील अनेक वर्षे कायम राहू शकते. अमेरिकेतील वाढत्या व्याजदराच्या कारणामुळे आर्थिक मंदीच्या चिंतेमध्ये कॉर्पोरेट जगताला मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे असे मार्क झुकरबर्ग यांचे म्हणणे आहे. अमेरीकेमध्ये Amazon आणि Microsoft आणि अशा अनेक कंपन्यांनी टाळेबंदी केली आहे.
पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर टाळेबंदीचा निर्णय घेण्यामागचे करणं म्हणजे मेटा कंपनी आर्थिक मंदीचा सामना करत आहे. यायाधीही नोव्हेंबर महिन्यात पहिल्या फेरीच्या टाळेबंदी वेळी झुकरबर्ग म्हणाले होते की, कंपनीच्या महसुलामध्ये घट झाल्यामुळे कमर्चाऱ्यांना काढून टाकण्याचा कठोर निर्णय घेण्यात आला होता. मेटा कंपनी आपल्या समतेच्या रचनेमध्ये मोठे बदल करत आहे. तसेच कमी महत्वाचे असणारे प्रकल्प रद्द करत आहे. काही दिवसांपूर्वीच मेटाने आपली kustomer कंपनी विकण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच नोकरभरतीच्या प्रमाण कमी करण्यात येणार आहे. कंपनीच्या १०,००० कर्मचाऱ्यांची कपात होणार असल्याच्या बातमीवरून मेटाच्या स्टॉकमध्ये प्रचंड तेजी पाहायला मिळत आहे.