मेटा-मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने मे महिन्यात भारतात १.७५ कोटींहून अधिक कंटेन्टवर कारवाई केली आहे. आपल्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अहवालात कंपनीने म्हटलंय की मे महिन्यात भारतात १३ उल्लंघन श्रेणी अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या अहवालात सांगण्यात आलंय की ज्या कंटेन्टच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे, ते छळ, बळजबरी, हिंसा किंवा ग्राफिक सामग्री, प्रौढ नग्नता आणि लैंगिक क्रियाकलाप, मुलांना धोक्यात आणणे, धोकादायक संस्था/व्यक्ती आणि स्पॅम यांसारख्या श्रेणींमध्ये येतात.
“कारवाई करणे म्हणजे फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरून कोणतीही सामग्री काढून टाकणे किंवा काहींना त्रासदायक वाटतील अशा प्रतिमा आणि व्हिडीओंना कव्हर करणे आणि चेतावणी जोडणे असे असू शकते.” असे अहवालात म्हटले आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यात लागू झालेल्या नवीन आयटी नियमांनुसार, ५० लाखांहून अधिक वापरकर्ते असलेल्या मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्राप्त झालेल्या तक्रारी आणि केलेल्या कारवाईचा तपशील देणारे अनुपालन अहवाल दरमहा प्रकाशित करणे आवश्यक आहे. त्यात अशा सामग्रीची माहिती देखील आहे जी सक्रिय असताना काढून टाकली गेली आहे किंवा थांबवली गेली आहे.
मोबाईल चोरीला गेल्यावर बँक डिटेल्स आणि मोबाईल वॉलेटचे संरक्षण कसे करायचे? जाणून घ्या सविस्तर माहिती
ट्विटर इंडियाच्या जून २०२२ च्या पारदर्शकता अहवालात असे म्हटले आहे की २६ एप्रिल २०२२ ते २५ मे २०२२ या कालावधीत देशात दीड हजाराहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात म्हटले आहे की मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल ४६,५०० हून अधिक खाती निलंबित करण्यात आली आहेत. तथापि, हा डेटा जागतिक कृतीशी संबंधित असून यामध्ये भारतातून आलेल्या कंटेन्टचाही समावेश असल्याचे म्हटले आहे.
मेटाच्या या मासिक अहवालात भारताबद्दल म्हटलं गेलंय की मे महिन्यात फेसबुकने १ मे ते ३१ मे २०२२ या कालावधीत १.७५ कोटींहून अधिक कंटेन्टवर कारवाई केली, तर इन्स्टाग्रामने याच कालावधीत १२ श्रेणींमधील जवळपास ४१ लाख सामग्रीवर कारवाई केली आहे. मेटा-मालकीच्या व्हॉट्सअॅपच्या अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की प्राप्त झालेल्या तक्रारींवर कारवाई करत मे महिन्यात १९ लाखांहून अधिक भारतीय खाती ब्लॉक करण्यात आली होती.