फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाग्राम, ट्विटर आदी अनेक अ‍ॅप आहेत, जिथे आपण फिरायला गेलो की, फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करतो. तसेच इतरांचेही स्टेट्स पाहतो. या तिन्ही अ‍ॅपवर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करण्यासाठी आणि पाहण्यासाठी वेगवेगळे फीचर्स आणि डिझाइन आहेत. त्यात एखादा व्हिडीओ फेसबुकवर बघायचा असेल तर फेसबुकच्या होम पेजवर दिसणाऱ्या ‘व्हिडीओ प्लेयर’ (Video Player) पर्यायावर क्लिक करावे लागते. त्यानंतर तुम्ही फॉलो केलेल्या विविध पेज (Page) चे एका खाली एक व्हिडीओ दिसू लागतात. तर हे व्हिडीओ तुम्हाला horizontal (आडवे) दिसतात. पण, हा प्रत्येक व्हिडीओ बघून झाल्यानंतर पुन्हा मागे जाऊन दुसरा व्हिडीओ ओपन करावा लागतो. तर आता युजर्सना चिंता करण्याची गरज नाही. कारण कंपनी टिकटॉक आणि इन्स्टाग्रामसारखं अपडेट फेसबुकसाठी घेऊन येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेटा मालकीच्या फेसबुकने जाहीर केले आहे की, मोबाइल डिव्हाइससाठी अपडेटेड व्हिडीओ प्लेयर आणणार आहेत. जो आता इन्स्टाग्राम रिल्स आणि टिकटॉकसारख्या उभ्या विंडोमध्ये म्हणजेच (व्हर्टिकल) ओपन होईल. कंपनीचे म्हणणे आहे की, “रील्स, मोठे (long) व्हिडीओ आणि लाइव्ह कन्टेन्ट आदी अनेक गोष्टी तुम्हाला फुलस्क्रीनवर पाहण्याचा आकर्षक अनुभव देण्याची कंपनी योजना आखत आहे.

हेही वाचा…दोन फोनमध्ये करा Quick Share; ॲप अन् इंटरनेटचीही गरज नाही, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

व्हिडीओ नक्की बघा…

व्हिडीओ प्लेयर अपडेटनंतर फेसबुक ॲपमध्ये फीडमधून स्क्रोल करताना तुम्हाला फुलस्क्रीन व्हर्टिकल व्हिडीओ दिसतील. आतापर्यंत फेसबुक ॲप डिव्हाइस आणि व्हिडीओच्या लांबीनुसार horizontal व्हिडीओ दाखवत होता, तर अपडेटनंतर तुमचा फोन फ्लिप करून तुम्ही नेहमी लँडस्केप मोडमध्ये व्हिडीओ पाहू शकता.

या अपडेटला पाहता असे दिसते की, फेसबुकने इन्स्टाग्राम ॲपशी प्रेरणा घेतली आहे. नवीन व्हिडीओ प्लेअरचा लूक सारखाच असला तरीही त्यात नवीन प्लेबॅक कंट्रोल्स असणार आहेत; जसे की व्हिडीओच्या खाली दिसणाऱ्या स्लाइडरचा वापर करून तुम्ही व्हिडीओचा आवडता पार्ट प्ले करू शकता. तसेच व्हिडीओ दहा सेकंद मागे किंवा पुढेसुद्धा करू शकता. तसेच व्हिडीओची लांबी (lengths)सुद्धा वाढवण्यात आली आहे. तसेच नवीन व्हिडीओ प्लेयर पहिल्यांदा युनायटेड स्टेट्स आणि कॅनडामध्ये राहणाऱ्या वापरकर्त्यांसाठी रोलआउट केला जाईल आणि त्यानंतर येत्या काही महिन्यांत सर्वत्र रोलआउट करण्यात येईल. याप्रमाणे फेसबुक आता रील्सला टक्कर देईल, असे म्हणायला हरकत नाही.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Facebook update video player in vertical full screen that offers alongside video playback controls asp
Show comments