फेसबुकवर अवलंबून असणाऱ्या अनेक डिजिटल मीडियाला आता मोठा फटका बसणार आहे. एप्रिल २०२३ ला ‘फेसबुक इस्टंट आर्टिकल’ बंद होणार आहेत. इन्स्टंट आर्टिकल बंद करण्याची घोषणा फेसबुकने केली असून याचा सोशल माध्यमांवर देखील परिणाम होणार आहे.
फेसबुक इन्स्टंट आर्टिकलमुळे अनेक संकेतस्थळांचा उदर्निवाह चालत होता. अनेक पत्रकारांनी फेसबुक इस्टंट आर्टिकलच्या मदतीमुळे स्वत:चे वृत्त संकेतस्थळ तयार केले होते. त्यांना आता मोठा फटका बसणार आहे. हे संकेतस्थळ आता फक्त गुगलच्या भरवशावर अवलंबून राहणार आहेत. इस्टंट आर्टिकल बंद होत असल्यामुळे डिजिटल मीडियासमोर मोठा प्रश्न उभा राहणार आहे.
आणखी वाचा : ट्वीटमधील टॅगवर नियंत्रण ठेवता येणार; काय आहे हे नवे फीचर जाणून घ्या
वाचकांना देखील बसणार फटका
इस्टंट आर्टिकलमुळे फेसबुक वापरकर्त्याला तात्काळ एखादा लेख, बातमी वाचण्यास मिळत होती. वेगात माहिती देण्यासाठी हे टुल्स काम करत होते. याचा फायदा बातमी प्रसिद्ध करणाऱ्या पेज मालकाला होत होता. फेसबुक त्यासाठी मानधन देत असे. तसेच याचा फटका वाचकांना देखील बसणार आहे. कारण इस्टंट आर्टिकलमुळे बंद होत असल्यामुळे वाचकांना तात्काळ एखादा लेख किंवा बातमी वाचता येणार नाही. फेसबुकवरुन मुख्य लिंकवर जाऊन त्यांना बातमी वाचावी लागेल.