Fast Charging Hurt Your Phone Battery : आधी स्मार्टफोन म्हटलं की कॅमेरा, साऊंड क्वॉलिटी बघितली जात होती. पण, आता इतरही अनेक फीचर्स मोबाइल विकत घेताना पाहिले जातात. त्यातील एक म्हणजे स्मार्टफोनची बॅटरी. अल्ट्रा-फास्ट चार्जर नेहमीपेक्षा अधिक वेगाने स्मार्टफोन चार्ज करण्याच्या क्षमतेमुळे प्रचंड लोकप्रिय होत आहेत.
पण, या चार्जरमध्ये काही अशा गोष्टीसुद्धा असतात, ज्याबद्दल बोलणं सहसा कोणी पसंत करत नाही. हे चार्जर नियमितपणे वापरताना तुम्ही अधिक सावध का असले पाहिजे त्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत नक्की वाचा (Fast Charging Hurt Your Phone Battery) …
१. हिट बिल्डअप (Heat Buildup) :
अल्ट्रा-फास्ट चार्जिंगमधील प्राथमिक समस्यांपैकी एक म्हणजे तुमच्या स्मार्टफोनमध्ये जास्त उष्णता निर्माण होऊ लागते (Fast Charging Hurt Your Phone Battery).
जलद चार्जिंगमुळे बॅटरीमध्ये अगदी कमी वेळात भरपूर पॉवर जाते, ज्यामुळे डिव्हाइस जास्त गरम होते आणि जे काही वेळेस धोकादायकसुद्धा ठरू शकते.
उष्णतेमुळे तुमच्या स्मार्टफोनवर थर्मल ताण येऊ शकतो, यामुळे अंतर्गत घटकांचे नुकसान होऊ शकते, बॅटरीचे आयुष्य कमी होऊ शकते, मोबाइल वापरादरम्यान तो जास्त गरम होऊ शकतो आणि काही वेळा स्फोटसुद्धा होऊ शकतो.
२. बॅटरी डिग्रेडेशन (Battery degradation) :
तुमचा फोन अल्ट्रा-फास्ट चार्ज करणे हे त्यांच्यासाठी उपयुक्त आहे, जे मुख्यतः दिवसभर कामासाठी बाहेर असतात. मोबाइल जलद चार्ज करणे वेळ वाचवत असेल, तरीही यामुळे बॅटरीचे आयुष्यदेखील कमी होते.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये लिथियम-आयन बॅटरी असल्यास, फास्ट चार्जिंगमुळे स्मार्टफोन लवकर खराब होईल.
अल्ट्रा-फास्ट चार्जरचा वारंवार वापर केल्याने बॅटरीचे आयुष्य कमी होऊ शकते, याचा अर्थ तुमचा स्मार्टफोन नवीन असतो तेव्हाच तो चार्जिंग टिकविण्यास मदत करेल.
३. कॉम्पॅटिबिलिटी समस्या (Compatibility issues) :
सर्व स्मार्टफोन्स अल्ट्रा-फास्ट चार्जिंग हाताळण्यासाठी डिझाइन करण्यात आलेले नाहीत, त्यामुळे जर तुम्ही जास्त पावरफुल चार्जर तुमच्या फोनसाठी वापरत असाल तर तो तुमच्या स्मार्टफोनला हाताळण्यासाठी कठीण जाऊ शकते. परिणामी कॉम्पॅटिबिलिटी समस्या, फोन जास्त गरम होणे किंवा अगदी चार्ज होत नाही, अशा समस्या उद्भवू शकतात.
डिव्हाइससाठी तुम्ही वापरत असलेला चार्जर योग्य आहे का नाही, ते तपासण्यासाठी कंपनीच्या सूचना वाचा.
४. वीजबिल वाढीचा धोका :
अल्ट्रा-फास्ट चार्जर्समुळे अचानक वीजबिलात वाढ होण्याचा धोका असतो (Fast Charging Hurt Your Phone Battery) , ज्यामुळे तुमच्या स्मार्टफोनमधील संवेदनशील (सेन्सिटिव्ह) घटकांना नुकसान होऊ शकते, म्हणजेच चार्जिंग पोर्ट किंवा बॅटरी.
अनेक चार्जरमध्ये सुरक्षिततेची सुविधा असते, तरीही विजेच्या संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. विशेषत: जेव्हा चार्जिंगचे वातावरण अस्थिर असते.
५. रिड्यूस बॅटरी लाईफस्पॅन (Reduced battery lifespan) :
अल्ट्रा-फास्ट चार्जिंगमुळे तुमच्या बॅटरीचे लाईफ पूर्णपणे कमी होऊन जाईल.
आता लाँच करण्यात आलेले नवीन स्मार्टफोन जुन्या मॉडेल्सपेक्षा जलद चार्जिंगला अधिक चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी डिझाइन केलेले आहेत.