वडील हे घरातील महत्त्वाचे सदस्य असतात, ज्यांच्या सावलीत कुटुंब सुरक्षित असते. आपल्या कुटुंबाची देखभाल करण्यासाठी आणि कुटुंबातील सदस्यांना आनंदी ठेवण्यासाठी ते रात्रंदिवस मेहनत करतात. वडीलही सर्वांवर प्रेम करतात, पण आपल्या भावना कोणाशीही शेअर करत नाहीत. वडिलांच्या या अथक प्रयत्नांबद्दल आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी फादर्स डे साजरा केला जातो. प्रत्येकजण आपल्या वडिलांना फादर्स डे निमित्त काय भेट देता येईल याचा विचार करत असतो. जर का तुमच्या वडिलांना जिममध्ये वर्कआऊट करण्यास आवडत असेल तर आज आपण अशा काही डिव्हाईसबद्दल जाणून घेणार आहोत जी तुम्ही तुमच्या वडिलांना भेट म्हणून देऊ शकता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अनेक जण रोज जिममध्ये किंवा वैयक्तिकरित्या व्यायाम करून आपले शरीर निरोगी राखण्याचा प्रयत्न करतात. फादर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या वडिलांना कोणकोणती फिटनेस गॅजेट्स भेट म्हणून देऊ शकतात हे जाणून घेऊयात. याबाबतचे वृत्त jagrantv ने दिले आहे.

हेही वाचा : Google Maps च्या ‘या’ तीन नव्या फीचर्समुळे प्रवास होणार आणखी सोपा; जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे ठरतील फायदेशीर?

फिटनेस ट्रॅकिंग असलेले स्मार्टवॉच

व्यायामाची आवड असणारा कोणालाही फिटनेस ट्रॅकिंग स्मार्टवॉच आवडेल असे गॅजेट आहे. हे तुम्ही किती स्टेप्स चालला किंवा धावला हे ट्रॅक करू शकते. तसेच हृदयाचे ठोके मोजते. व्यायामामुळे तुमच्या किती कॅलरीज बर्न झाल्या आहेत हे देखील तुम्हाला हे स्मार्टवॉच दाखवते. तसेच काही स्मार्टवॉच विविध प्रकारचे फिटनेस मोड देते. ज्याचा वापर आपल्याला व्यायाम करताना होऊ शकतो.

वायरलेस हेडफोन्स

अनेकांना व्यायाम करत असताना वर्कआऊट करत असताना गाणी ऐकण्याची सवय असते. यामुळे तुम्ही तुमच्या वडिलांना वायरलेस हेडफोन्स गिफ्ट देण्याचा विचार करू शकता. गाणी ऐकत व्यायाम केल्यामुळे एक वेगळ्याच प्रकारची ऊर्जा निर्माण होत असते. गाणी ऐकत असल्याने व्यायाम करताना उत्साह निर्माण होतो. त्यामुळे तुम्ही असे एखादे चान्गले वायरलेस हेडफोन्स गिफ्ट म्हणून देऊ शकता.

फिटनेस ट्रॅकर

फिटनेस ट्रॅकर हे एक लहानसे गॅजेट आहे. हे मनगटावर बांधले जाते. हे फिटनेस ट्रॅकर फिटनेस उपयांना ट्रॅक करते. जसे की आपण किती चाललो, किती कॅलरीज बर्न झाल्या हे देखील हे गॅजेट ट्रॅक करते. हे असे एक लहान गॅजेट देखील तुम्ही तुमच्या वडिलांना भेट देऊ शकता. यामुळे त्यांना खूप फायदा होऊ शकतो.

हेही वाचा : WhatsApp लवकरच आणणार ‘हे’ भन्नाट फिचर; आता व्हॉइस मेसेजप्रमाणेच पाठवता येणार…

पोर्टेबल ब्लेंडर बॉटल

फादर्स डे निमित्त तुम्ही तुमच्या वडिलांना पोर्टेबल ब्लेंडर बॉटल भेट देऊ शकता. जेणेकरून त्यामध्ये ते प्रोटीन ड्रिंक्स किंवा स्मूदी तयार करू शकतील. या बॉटलमध्ये इनबिल्ट ब्लेड असतात ते वापरताच पदार्थ एकत्रित करण्यास मदत करतात. या गॅजेटमुळे वडिलांना व्यायामानंतर प्रोटीन ड्रिंक्स पिणे शक्य होईल.

मसाज गन

वर्कआऊट करत असताना स्नायूंवर ताण येणे किंवा थोडी अस्वस्थता वारंवार जाणवू शकते. एखाद्या वेळेस एखादा व्यायाम योग्य पद्धतीमध्ये न झाल्यास स्नायू दुखू शकतात. त्यापासून आराम मिळावा म्हणून तुम्ही तुमच्या वडिलांना मसाज गन हे गॅजेट्स भेट देऊ शकता. या गॅजेटच्या मदतीने मसाज केला असता ज्यामुळे स्नायूंना आराम मिळू शकतो.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fathers day 2023 massage gun wireless headphones fitness tracker gift best workout gadgets check details tmb 01