Chinese phishing scam: चिनी फिशर्स अमेरिकेतील रहिवाशांची टेक्स्ट मेसेजद्वारे अमेरिकन टोल रोड ऑपरेटरच्या नावाने फसवणूक करत आहेत. हे मेसेज बनावट टोल बिलांसह संपूर्ण अमेरिकेतील आयफोन आणि अँड्रॉइड वापरकर्त्यांना लक्ष्य करीत असल्याचे म्हटले जाते. FBI ने वापरकर्त्यांना हे मेसेज त्वरित डिलीट करण्याचा सल्ला दिला आहे.

अँटी-फिशिंग वर्किंग ग्रुप (APWG)च्या रिपोर्टनुसार, “अमेरिकेतील रहिवाशांवर चिनी फिशर्सकडून टोल रोड ऑपरेटरच्या नावाने मेसेजेसचा भडिमार केला जात आहे, ज्यामध्ये मल्टी-स्टेट E-ZPass समाविष्ट आहे.” या स्कॅमर्सकडून पॅकेज डिलिव्हरी आणि इतर खोटे संदेशदेखील पाठवले आहेत. याला फोनवर केलेले एक प्रकारचे आक्रमण मानले जाते. डिसेंबर २०२४ मध्ये FBI ने अमेरिकन लोकांना चिनी हॅकर्समुळे संदेश न पाठविण्याचा सल्ला दिला.

घोटाळ्याबद्दल एफबीआयने काय म्हटलेय?

फोर्ब्सला दिलेल्या एका विधानात एफबीआयने सांगितले : “हे मेसेज दाखवतात की न भरलेल्या (unpaid) टोलसाठी प्राप्तकर्त्याला पैसे देणे बाकी आहेत आणि त्यात जवळपास सारखं शब्दांकन असतं. ‘बाकी असलेली टोल रक्कम’देखील एकसारखी आहे. पण, मेसेजमध्ये दिलेली लिंक राज्याच्या टोल सर्व्हिसच्या नावाने नक्कल करण्यासाठी तयार केली जाते आणि फोन नंबर राज्यांनुसार बदलताना दिसतात.”

स्कॅमर्स राज्य आणि शहरातील टोल एजन्सींची तोतयागिरी करण्यासाठी हजारो डोमेन नोंदणी करीत आहेत. तसेच ते चीनमधील प्रगत फिशिंग किट वापरून जवळजवळ एकसारखेच घोटाळे करणारे मेसेज पाठवीत आहेत.

हे मेसेज टोल वापराकडे दुर्लक्ष करून अनेकदा कोणत्याही फोन नंबरवर पाठवले जातात. सामान्यत: .TOP, .CYOU व .XIN सारख्या चिनी शीर्षस्तरीय डोमेनसह दुवे समाविष्ट करतात. विशेषत: .TOP डोमेनचा गैरवापराचा इतिहास आहे आणि तो ICANN तपासणी अंतर्गत राहतो.

SMS आणि RCS प्रोटोकॉलवर स्पॅमविरोधी उपाययोजना असतानाही फसवणूक करणारे सातत्याने नवनवीन पद्धती वापरत आहेत, ज्यामुळे प्रतिबंध करणे कठीण होत आहे. जागतिक ब्लॉकिंग यंत्रणा सुधारायला मदत व्हावी यासाठी वापरकर्त्यांनी या घोटाळ्यांसंबंधित तक्रारी कराव्यात, असे आवाहन करण्यात येत आहे आणि कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक केले गेल्यास पासवर्ड बदलण्यासारखी खबरदारी घ्यावी. तसेच केवळ अधिकृत स्रोतांकडूनच टोल शुल्क पडताळून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader