Fenado AI Builds Apps And Websites In Minutes : सध्या आपण सगळेच विविध तंत्रज्ञानमय जगात वावरतो आहोत. या आधुनिक जगात संगणक कोडिंग हे एक महत्त्वाचे कौशल्य ठरते आहे. कोडिंगमुळे मानवाला या उपकरणांशी संवाद साधता येतो. पण, सह-संस्थापक व शार्क टँक इंडियाचे न्यायाधीश अझहर इक्बाल यांनी इनशॉर्ट्सचे माजी तंत्रज्ञान प्रमुख मनीष सिंग बिश्त यांच्याबरोबर मिळून फेनाडो एआय (Fenado AI) हा नवा उपक्रम सुरू केला आहे.
कंपनीच्या माहितीनुसार Fenado AI हे स्टार्टअप्स, छोटे व्यवसाय आणि मोठ्या संस्थांसाठी डिझाइन केले आहे, जे एंड-टू-एंड टेक सोल्यूशन्स ऑफर करत आहेत. ज्यांच्याकडे कोडिंग कौशल्य नसेल त्यांनासुद्धा काही मिनिटांत ॲप्स आणि वेबसाइट तयार करण्यात प्लॅटफॉर्म मदत करणार आहे.
Fenado एआयचे सह-संस्थापक व सीईओ इक्बाल यांनी YourStory ला सांगितले की, “आमचा प्रस्ताव अगदी सोपा आहे. प्रत्येक स्टार्टअपला कोडिंग, ॲप डेव्हलपमेंट व वेबसाइट निर्मितीमध्ये कौशल्य असलेल्या म्हणजेच अगदी सर्व तांत्रिक ज्ञानाने संपन्न असलेल्या सह-संस्थापकाची आवश्यकता असते. पण, आता एआयमधील प्रगतीमुळे ही बाब आता स्वतंत्रपणे हाताळले जाऊ शकते. Fenado AI हे कोडिंग ज्ञान नसलेल्या कोणत्याही व्यक्तीस ॲप किंवा वेबसाइट तयार करण्यास अनुमती देणार आहे. हे स्टार्टअप्स त्यांच्यासाठी खास असेल, ज्यांना तंत्रज्ञानाचे फारसे ज्ञान नाही. अनेक दशकांपासून चांगल्या कल्पना डोक्यात असूनसुद्धा अनेक उद्योजकांना परवडणाऱ्या आणि टेक टॅलेंटच्या कमतरतेमुळे अनेकदा अपयश आले आहे, अशा त्या सगळ्यांसाठीच हा उपक्रम आहे,” असे त्यांनी सांगितले आहे.
उद्योजक आणि व्यावसायिकांना त्यांच्या तंत्रज्ञानाच्या गरजा व्यवस्थापित करून मदत करणे, त्यांचा वेळ वाचवणे, खर्च कमी करणे, नवीन कल्पना वापरणे आणि त्यांचे लक्ष मुख्य धोरणांवर केंद्रित करणे, हे या स्टार्टअपचे उद्दिष्ट असणार आहे. कोणताही व्यवसाय किंवा उद्योजक चॅटद्वारे त्यांच्या गरजा आणि डिझाइन प्राधान्ये सामायिक करून, त्यांच्या व्यवसायासाठी प्लॅटफॉर्म ॲप किंवा वेबसाइट तयार करू शकणार आहेत. त्यासाठी कोडिंग कौशल्य किंवा टेक टीमची गरज भासणार नाही.
१० हजारपेक्षा जास्त ग्राहकांना ऑनबोर्ड करण्याचे उद्दिष्ट
तर Fenado AI ने यापूर्वीच यूएस, युरोप, भारतातील बीटा टप्प्यात २०० पेक्षा जास्त पैसे देणाऱ्या जागतिक ग्राहकांना ऑनबोर्ड केले आहे. २०२५ च्या अखेरीस जागतिक स्तरावर १० हजारपेक्षा जास्त ग्राहकांना ऑनबोर्ड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. गेल्या महिन्यात कंपनीचा महसूल तीन लाख रुपये होता आणि या महिन्यात तो २० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल, अशी अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. हा प्लॅटफॉर्म सर्वांना उपलब्ध व्हावा यासाठी टियर-२ आणि टियर-३ कमी सेवा असलेल्या शहर, प्रदेशांवरही लक्ष केंद्रित करणार आहे. एआय तंत्रज्ञान हाताळत असताना भाजीविक्रेत्यानेही त्यांच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करून, असा प्लॅटफॉर्म सुरू करण्यास सक्षम असावे, असे यावेळी इक्बाल यांनी सांगितले आहे.
AI कोडिंग क्षेत्रात ९९ टक्के मानव अधिक कार्यक्षम असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे या प्रगतीसह Fenado AI मधील लोकांनी AI च्या मदतीने जागतिक दर्जाचे ॲप्स आणि वेबसाइट तयार करावेत, अशी आमची इच्छा आहे. साधने अगदी विश्वासार्ह आहेत आणि नेव्हिगेट करणाऱ्या स्टार्टअपसाठी महत्त्वपूर्ण आहेत. Fenado AI वेळेची बचत करते, एण्ड-टू-एण्ड टेक सपोर्ट देते आणि टेक टॅलेंट शोधण्याची आव्हाने दूर करते, असे Fenado AI चे सह-संस्थापक व सीटीओ (CTO) मनीष सिंग बिश्त म्हणाले आहेत