अमेरिकेतील AI स्टार्टअप कंपनी असणाऱ्या OpenAI या कंपनीने आपला ChatGpt चॅटबॉट लॉन्च केला आहे. हा एक कृत्रिम चॅटबॉट आहे. हे माध्यम असे आहे की तुम्ही जे त्याला विचाराल त्याचे त्याच्याकडे असलेल्या माहितीरून तो आपल्याला उत्तर देते. आता google ने देखील आपला AI Bard चॅटबॉट लॉन्च केला आहे.

Bard चॅटबॉट हा १८० देशांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. तसेच उर्वरित देशांमध्ये लवकरच बार्ड सुरु गुगलने सांगितले आहे. सध्या वापरकर्त्यांना एआय बार्डमध्ये इंग्रजी, जपानी आणि कोरियन या तीनच भाषांचा सपोर्ट मिळणार आहे. लवकरच याला अन्य भाषांचा देखील सपोर्ट मिळणार आहे. आता बार्डचे लॉन्चिंग झाल्यामुळे chatgpt आणि bard या दोन्ही चॅटबॉटची तुलना सुरु झाली आहे. आज आपण अशा गोष्टी जाणून घेणार आहोत जे बार्ड करू शकते पण चॅटजीपीटी करू शकत नाही. याबाबतचे वृत्त बिझनेस इनसाईडरने दिले आहे.

thackeray group criticized pm narendra modi
“पंतप्रधान मोदींना मणिपूरपेक्षा रशिया-युक्रेन युद्धाची काळजी” ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्र; म्हणाले…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
helium leaks discovered on boeings starliner
विश्लेषण :अंतराळयानामध्ये हेलियमचा वापर का केला जातो? बोईंग स्टारलाइनरचा पेच हेलियम गळतीमुळे?
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
iPhone 15 and 14 Price cut
Apple iPhone Price in India: iPhone १६ लाँच होताच iPhone 15 आणि iPhone 14 च्या किंमती घसरल्या, जाणून घ्या नवे दर
tall people cancer risk
उंच लोकांना होऊ शकतो तब्बल आठ प्रकारचा कॅन्सर, इतरांच्या तुलनेत धोकाही सर्वाधिक; कारण काय?
pimpri chinchwad traffic jam marathi news
पिंपरी-चिंचवडमध्ये २६ चौकांत वाहतूककोंडी
Hyundai Exter New Variants Launched
Hyundai Exter चे दोन नवे व्हेरिएंटचे लाँच, जाणून घ्या ‘या’ एसयुव्हीचे फीचर्स अन् किंमत

हेही वाचा : खूशखबर! आता पर्सनल चॅट्स दुसऱ्यांपासून लवपता येणार, WhatsApp ने लॉन्च केलेले ‘हे’ फिचर एकदा पाहाच

इंटरनेटचा वापर

सध्या ChatGpt वापरकर्त्यांना इंटरनेटचा वापर करण्यास परवानगी देत नाही. मात्र बार्ड तुमच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी इंटरनेटचा वापर करतो. य्यामुळे अधिक माहितीसह बार्ड तुमच्या प्रश्नाची उत्तरे देतो.

Gmail मध्ये इंटिग्रेशन

गुगलने आपल्या इव्हेंटमध्ये सांगितले होते, बार्डला जीमेलसह इंटिग्रेट केले जाणार आहे. ज्यामुळे App मध्येच तुम्ही जीमेल सहजपणे लिहू शकता. तर चॅटजीपीटी सध्या कोणत्या ईमेल अ‍ॅप्लिकेशनसह इंटिग्रेट करत नाही.

सहजपणे करू शकता गुगल डॉक्स आणि जीमेलमध्ये एक्स्पोर्ट

जीमेलसह अपकमिंग इंटिग्रेशनशिवाय बार्ड आधीच वापरकर्त्यांना जनरेटेड कंटेंटला जीमेल आणि गुगल डॉक्समध्ये एक्स्पोर्ट करण्याची परवानगी देते. यातून जनरेट होणारा कंटेंट वापरणे तुम्हाला सोपे ठरू शकते. मात्र ChatGpt चा वापर करताना तुम्हाला फक्त कंटेंट कॉपी करता येतो.

हेही वाचा : टाटाचे टेक्नॉलॉजीत मोठे पाऊल! भारतात तयार होणार ‘मेड इन इंडिया आयफोन’, चीनला बसणार मोठा झटका

व्हॉइस प्रॉम्प्टची वापर करू शकता

ईतर गुगल अप्प्सप्रमाणे तुम्ही बार्डला प्रश्न विचारण्यासाठी तुम्ही व्हॉइस प्रॉम्प्टचा वापर करू शकतो. जे सध्या चॅटजीपीटीसह शक्य नाही. व्हॉइस प्रॉम्प्ट हे वापरण्यासाठी सोपे असते. यामध्ये तुम्ही टाईप न करता प्रश्न विचारू शकता.

नवीन माहिती मिळते

बार्ड हे इंटरनेटशी जोडलेले आहे. त्यामुळे ते तुम्हाला नवीन माहिती पुरवू शकते. सध्या चॅटजीपीटी हे सप्टेंबर २०२१ पर्यंत मर्यादित आहे. बार्ड हे व्यावसायिक आणि विद्यार्थी यांच्यासाठी उपयुक्त ठरू शकते कारण ते तुम्हाला लेटेस्ट माहिती पुरवते.

कोडिंग

गुगलचे बार्ड २० पेक्षा जास्त प्रोग्रामिंग भाषांना सपोर्ट करते. हे फक्त एका लिंकचा वापर करून प्रोग्रामबद्दल माहिती मिळवता येऊ शकते. चॅटजीपीटी हे कोडिंगमध्ये चांगले आहे मात्र त्याला तुम्ही लिंक दिल्यास ते तुम्हाला प्रोग्रॅम एक्सप्लेन करू शकत नाही.