ISRO Chandrayaan-3 Moon Landing Update : चांद्रयान ३ मोहिम आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. २० ऑगस्ट म्हणजेच आज रविवारी पहाटे चांद्रयान ३ ने आणखी कक्षा कमी केली असून आता ते चंद्राभोवती अगरदी जवळने म्हणजे २५ बाय १३४ किलोमीटर अशा लंबवर्तुळाकार कक्षेत फिरत आहे. म्हणजेच चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या २५ किलोमीटर अंतरावरुन चांद्रयान ३ चा प्रवास सुरु झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

२३ ऑगस्टला चांद्रयान ३ हे चंद्रावर उतरणार असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने याआधीच जाहिर केलं होतं. पण नेमकी वेळ सांगितली नव्हती. आज कक्षेत शेवटचा बदल केल्यावर इस्रोने हे नेमकी वेळ सांगितली आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी चांद्रयान ३ हे चंद्राच्या पृष्ठभागावर दक्षिण भागात अलगद उतरण्याचा प्रयत्न करणार आहे.

हेही वाचा… भारताच्या चांद्रयान-३ च्या दोन दिवसांआधीच आणखी एक यान चंद्रावर उतरणार; जाणून घ्या रशियाचा प्रोजेक्ट ‘लूना-२५’!

हेही वाचा… Chandrayaan-3 : ISROच्या मोहिमेचा चंद्रावरील helium 3 शी संबंध काय? हे खनिज का महत्वाचे?

यानिमित्ताने चंद्रावर उतरण्यासाठी आवश्यक उपकरणांच्या अंतर्गत तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. चंद्रावर उतरणे हे अत्यंत आव्हानात्मक असणार आहे. कारण प्रचंड वेगाने चंद्राभोवती फिरणाऱ्या चांद्रयान ३ ला वेग कमी करत आणि पृष्ठभागावर उतरण्यासाठी आवश्यक इंजिनांचे योग्य वेळ आणि योग्य दाबाने प्रज्वलन करावे लागणार आहे. कारण चांद्रयान २ मोहिमेत याच इंजिनांनी गडबड केली होती, तसंच चंद्रावर उतरतांना उंचीचा अंदाज चुकल्याने चांद्रयान २ हे अलगद न उतरतांना वेगाने आदळले होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Finally isro set time for chandrayaan 3 to land on moon on 23rd august asj
Show comments