Financial Feature Twitter : इलॉन मस्क यांनी ट्विटर हातात घेतल्यानंतर त्यातील फीचर्समध्ये काही बदल केले आहेत. मस्क यांनी ब्ल्यू टीक सेवा नवीन स्वरुपात उपलब्ध केली आणि ट्विटसाठीची अक्षर मर्यादा देखील वाढणार असल्याचे काही अहवालांतून समोर आले होते. आता मस्क यांनी गुंतवणूकदार, व्यापारी, आर्थिक तज्ज्ञ आणि संस्थांसाठी गुरुवारी एक अनोखे फीचर सादर केले आहे. काय आहे हे फीचर आणि ते कसे काम करते? जाणून घेऊया.

ट्विटरच्या नवीन फीचरद्वारे युजरला ट्विटमध्ये क्रिप्टोकरन्सी, एक्सचेंज ट्रेडेड फंड आणि प्रमुख स्टॉक्सचे चार्ट आणी आलेख पाहण्यास मदत करेल. ट्विटर बिझनेस हँडलने या नवीन फीचरबाबत स्पष्टीकरण दिले आहे. जेव्हा तुम्ही मोठ्या स्टॉकच्या संक्षिप्त रुपला त्याच्या समोर ‘$’ हे चिन्ह लावून ट्विट कराल तेव्हा ते स्टॉक आपोआप क्लिक करण्यासाठी उपलब्ध होईल आणि ते युजरला त्या स्टॉकबाबतच्या शोध परिणामांवर घेऊन जाईल जे किंमतीचा आलेख आणि त्याबद्दलचा इतर डेटा दर्शवेल.

Aai Kuthe Kay Karte
अरुंधतीचं पूर्ण नाव काय? प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या पत्नीने दिलं एकदम करेक्ट उत्तर, पाहा व्हिडीओ
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
15 November Mesh To Meen Horoscope
१५ नोव्हेंबर पंचांग: कार्तिक पौर्णिमेला कोणाला होईल धनप्राप्ती? जन्मराशीनुसार तुम्हाला पावणार आज भगवान विष्णू व देवी लक्ष्मी; वाचा राशिभविष्य
Use UPI without Bank account NPCI launches new feature UPI Circle for family members and friends
आता बँक खाते नसलेला व्यक्ती करू शकतो UPIचा वापर; NPCIने कुटुंबातील सदस्यांसाठी सुरू केलं UPI Circle, जाणून घ्या नव्या फीचरबद्दल…
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक

जेव्हा तुम्ही प्रमुख स्टॉक, ईटीएफ किंवा क्रिप्टोकरन्सीचे चिन्ह ‘$’ सह ट्विट कराल जसे ($BTC) तेव्हा लोकांना क्लिक होणारी लिंक दिसून येते जी त्यांना शोध परिणामांवर घेऊन जाते. आजपासून या शोध परिणामांमध्ये प्रमुख चिन्हांसाठी किंमत दर्शवणारे आलेख समाविष्ट असतील, असे ट्विटरच्या बिझनेस हँडलकडून ट्विट करण्यात आले आहे.

(६३ हजारांच्या आत मिळवा महागडा Iphone 14, ‘या’ वेबसाईटवरून करा खरेदी)

तुम्ही ट्विटमध्ये लिंकवर क्लिक न करता थेट चिन्हे शोधू शकता. $ सह किंवा त्याशिवाय अनेक चिन्हे तुम्ही शोधू शकता (QQQ or $QQQ), असेही ट्विटर बिझिनेस हँडलकडून ट्विट करून सांगण्यात आले आहे. इलॉन मस्क यांनी हे फीचर ट्विटरवर सादर केल्याबद्दल ट्विटर टिमचे कौतुक केले आहे.