iPhone निर्माता Apple ने मंगळवारी भारतात पहिले Apple Store लॉन्च केले आहे. Apple चे सीईओ टीम कुक यांनी आज (मंगळवारी) भारतातील पहिले वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे भारतातील पहिले Apple रिटेल स्टोअरचे उद्घाटन केले. कंपनीने २०२२ मध्ये देशातील पहिले ऑनलाईन स्टोअर उघडले होते. मुंबईच्या अॅपल स्टोअरच्या भिंतींवर मुंबईच्या काळी -पिवळी टॅक्सी कलेतून प्रेरित पेंटिंग्ज साकारण्यात येणार आहेत. याशिवाय अॅपल बीकेसी क्रिएटिव्हमध्ये अॅपलची अनेक उत्पादने आणि सेवा देखील कोरल्या जातील. स्टोअरचे क्रिएटिव्ह “हॅलो मुंबई” या क्लासिक अॅपल टॅगलाइनअंतर्गत तुमचे स्वागत करण्यात येणार आहे.
Apple चे मुंबईतील स्टोअर रिलायन्स इंडस्ट्रीच्या जिओ वर्ल्ड ड्राईव्ह मॉलमध्ये उभारण्यात आले आहे. हे स्टोअर या मॉलमध्ये २२ हजार स्केअरफूटमध्ये उभे राहिले आहे. मुंबईचे स्टोअरही न्यूयॉर्क, बीजिंग आणि सिंगापूरसारख्या अॅपलच्या स्टोअरसारखेच असणार आहे. अॅपल स्टोअरची रचना ही आकर्षक आणि ऊर्जा-कार्यक्षम आशा प्रकारे करण्यात आली आहे. आहे. Apple Store ची रचना नूतनीकरणक्षम उर्जेवर केली गेली आहे.
२५ वर्षांनंतर उघडले पहिले Apple Store
Apple स्टोअर अशा वेळी उघडले आहे जय वर्षी कंपनी भारतामध्ये आपले २५ सावे वर्ष साजरे करत आहे. बीकेसीमध्ये स्टोअर सुरु झाल्यावर २० तारखेला दिल्लीमध्ये apple चे दुसरे स्टोअर सुरु होणार आहे. Apple कडे भारतासाठी मोठ्या योजना आहेत, ज्यात एक मजबूत अॅप डेव्हलपर इकोसिस्टम, टिकाऊपणाचे समर्पण, अनेक ठिकाणी समुदाय कार्यक्रम आणि स्थानिक उत्पादन यांचा समावेश आहे.
Apple च्या सीईओंनी उघडले ग्राहकांसाठी दरवाजे
भारतातील पहिल्या Apple स्टोअरचे उद्घाटन कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी हस्ते नव्या अंदाजामध्ये केले. टीम कुक यांनी स्टोअरचा दरवाजा उघडून ग्राहकांचे स्वागत केले. Apple ने १९८४ मध्ये भारतात पहिल्यांदा Macintosh लॉन्च केले होते. आणि आता २५ वर्षांनंतर Apple BKC, मुंबई येथे पहिले Apple Store उघडण्यात आले आहे. Apple चे सीईओ टिम कुक म्हणाले, “हा एक लांबचा प्रवास आहे, Apple भारतात आपले स्टोअर उघडत आहे याचा मला आनंद आहे.”