सध्या टेक्नॉलॉजी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात प्रगती आणि बदल होताना दिसून येत आहेत. सगळीकडे ChatGpt चा वापर करण्याचे प्रमाण हळू हळू वाढत आहे. अलीकडील काही वर्षांमध्ये टेक्नॉलॉजी सुलभ झाली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना स्वस्त मात्र अत्यंत उपयोगी अशी गॅजेट्स देखील खरेदी करता येतात. तसेच Amazon आणि Flipkart सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे हे गॅजेट्स आणखी थोडी स्वस्त किंवा लोकांना खरेदी करता येतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Amazon वर अशी पाच गॅजेट्स उपलब्ध आहेत. जी वापरकर्त्यांच्या बजेटमधील देखील आहेत आणि रोजच्या वापरामध्ये उपयोगी पडणारी देखील आहेत. आज आपण ५०० रुपयांच्या मधील अशा काही गॅजेट्सबद्दल जाणून घेणार आहोत. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

हेही वाचा : Weekly Tech Updates: केरळने केलेल्या मोफत इंटरनेटच्या घोषणपासून ते AI च्या मदतीने महिलेने तयार केलेल्या नवऱ्यापर्यंत, टेक क्षेत्रातील घडामोडी एका क्लिकवर

मल्टी-फंक्शन कीचेन लाइट

‘मल्टी फंक्शन किचेन लाइट’ हे गॅजेट्स तुमहाला Amazon वर २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करता येईल. टेक्नॉलॉजीची आवड असणाऱ्या आणि नवनवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून पाहणाऱ्यांकडे हे गॅजेट्स असले पाहिजे. हे गॅजेटमध्ये एलईडी लाइट असतो. तसेच यात एक चुंबक देखील असते. या गॅजेटला यूएसबी टाईप- सी चार्जच्या मदतीने चार्ज केले जाऊ शकते.

वायरलेस ब्लूटूथ ४.० अँटी लॉस्ट Theft Alarm Device

Wireless Bluetooth 4.0 Anti-Lost Anti-Theft Alarm Device हे एक परवडणारे आणि उपयुक्त गॅजेट आहे जे तुम्ही २०० रुपयांपेक्षा कमी किंमतीमध्ये खरेदी करु शकता. QOCXRRIN वायरलेस ब्लूटूथ 4.0 अँटी-लॉस्ट अँटी-थेफ्ट अलार्म डिव्हाइस, नावाप्रमाणेच एक ब्लूटूथ ट्रॅकर आहे. दोन्ही अँड्रॉइड डिव्हाईससह ते वापरता येते. तसेच आपल्या किचनला देखील ते जोडता येते. याची बॅटरी बदलता येते.

Hkaudio M28 TWS इन-इअर इअरबड्स विथ इअरबड्स

Hkaudio M28 TWS इन-इअर इअरबड्स हा एक वायरलेस इअरफोन आहे. ज्याच्या बरोबर पॉवर बँक देखील येते. याची किंमत ५०० रुपयांपेक्षा थोडीशी जास्त आहे. यामध्ये यूएसबी टाईप ए आणि टाईप ए पोर्ट देण्यात आले आहे. हे डिव्हाईस ब्लूटूथ ५.१ कनेक्टिव्हिटीसह येते. तसेच गेमिंग मोडला देखील हे इअरबड्स सपोर्ट करतो.

हेही वाचा : अधिक Validity असलेला रिचार्ज प्लॅन शोधताय? Airtel ने लॉन्च केला ‘हा’ जबरदस्त प्लॅन, जाणून घ्या

VIHM 7 मध्ये 1 इलेक्ट्रॉनिक क्लीनर किट

VIHM 7 in 1 इलेक्ट्रॉनिक क्लीनर किट तुम्हाला केवळ ३९९ रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. याचा वापर तुम्हाला मॉनिटर्स, कीबोर्ड, फोन एअरपॉड्स आणि लॅपटॉप स्वछ, साफ करण्यासाठी करता येतो. हे सर्वात स्वस्त ऑल इन वन क्लिनिंग डिव्हाईस आहे. हे गॅजेट amazon वर उपलब्ध आहे.

Wecool नायलॉन ब्रेडेड 3 इन 1 चार्जिंग केबल

Wecool नायलॉन ब्रेडेड 3 इन 1 चार्जिंग केबल ही केबल ३३३ रुपयांना उपलब्ध आहे. ही एक युनिव्हर्सल चार्जिंग केबल आहे. जी Apple आणि अँड्रॉइड डिव्हाईसवर वापरता येऊ शकते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Five affordable gadgets buy under 500 in amazon flipkart earbuds alarm device charging cable tmb 01
Show comments