ChatGpt हा एक कृत्रिम चॅटबॉट आहे. याच्या मदतीने आपण अनेक प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो. चॅटजीपीटी लॉन्च झाल्यानंतर, आत्तापर्यंत हा चॅटबॉट अनेक सर्च इंजिनमध्ये समाविष्ट झाला आहे. तसेच मागच्या महिन्यामध्ये ChatGpt -4 ओपनआयने लॉन्च केले आहे . जी आधीपेक्षा अधिक अचूक आणि प्रगत असल्याचे म्हटले जाते.

आज आपण या बातमीच्या माध्यमातून असाच काही AI च्या मोबाईल अप्लिकेशन बद्दल जाणून घेणार आहोत. ज्याच्या मदतीने तुमची अनेक कामे अगदी सहजपणे होऊ शकतात. हे सर्व Apps चॅटजीपीटीद्वारे समर्थित आहेत. हे तुम्ही अँड्रॉइड फोनमधील Play Store वरून डाउनलोड करू शकता.

poco x7 pro and poco x7 launched in india
Poco X7 Series: बजेट फ्रेंडली आणि पॉवर परफॉर्मन्स असलेले पोकोचे दोन फोन लाँच; किंमता आणि फिचर्स जाणून घ्या
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
WhatsApp New Feature for meta AI
WhatsApp New Feature: व्हॉट्सअ‍ॅपचे ‘हे’ नवीन फीचर पाहिलंत का? मदत मागणं होईल सोपं, पाहा कसा होईल फायदा
How to scan qr codes from your phone without using app or device step by step guide
दुसऱ्या अ‍ॅपची मदत न घेता तुमच्या फोनमधील क्यूआर कोड करा स्कॅन; कसे ते जाणून घ्या…
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
SEBI is now also obsessed with AI to speed up the process Claims that work is underway on more than a dozen projects print eco news
प्रक्रियेत गतिमानतेसाठी सेबीचाही आता ‘एआय’ ध्यास! डझनभराहून अधिक प्रकल्पांवर काम सुरू असल्याचा दावा

हेही वाचा : Twitter वर एलॉन मस्क यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींना फॉलो, युजर्स म्हणाले…

Apo Assistant

APO असिस्टंट हे एक लोकप्रिय अ‍ॅप आहे जे १ दशलक्षाहून अधिक लोकांनी डाउनलोड केले आहे आणि २६,००० हून अधिक लोकांनी त्याचे पुनरावलोकन केले आहे. या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही कोडिंग, कंटेंट समरी इत्यादी प्रकारची कामे करू शकता. हे अ‍ॅप तुमच्यासाठी गणितातील समस्या आणि संगीताची रचना देखील लिहू शकते.

ChatOn

चॅटऑन हे अ‍ॅप्लिकेशन सुद्धा तुम्ही अँड्रॉइड फोनवर प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. हे अ‍ॅप आतापर्यंत एकूण ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केले आहे. हे अ‍ॅप्लिकेशन ChatGpt-4 वर आधारित आहे. त्याच्या मदतीने तुम्ही तुमची लेखन रचना सुधारू शकता.जर तुम्ही एखाद्या व्यवसायाशी संबंधित असाल आणि प्रेक्षकांसाठी चांगला मजकूर लिहायचा असेल तर या अ‍ॅपच्या मदतीने तुम्ही हे काम करू शकता.

Aico

Aico अ‍ॅप्लिकेशन GPT 3.5 वर आधारित आहे. याचा वापर तुम्ही तुमचे व्याकरण आणि भाषांतर सुधारण्यासाठी करू शकता. हे अ‍ॅप्लिकेशन सध्या ५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी डाउनलोड केले आहे. तसेच १७,००० पेक्षा जास्त लोकांनी त्याचे पुनरावलोकन केले आहे.

हेही वाचा : मुंबईतील Apple रिटेल स्टोअरजवळ ‘या’ २२ दिग्गज ब्रँड्सना आपली दुकाने उघडता येणार नाहीत, जाणून घ्या कारण

ChatSonic

चॅट सोनिक हे देखील एक लोकप्रिय अ‍ॅप आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही डिजिटल आर्ट आणि कोणत्याही प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता. या अ‍ॅपमध्ये तुम्हाला व्हॉईस सर्चचा पर्यायही मिळतो. हे अ‍ॅप अगदी चॅटजीपीटीसारखेच आहे.

Alissu

Alissu चॅट GPT 3.5 वर आधारित आहे . ज्याचा वापर तुम्ही भाषा भाषांतरासाठी करू शकता. याशिवाय हे अ‍ॅप अनस्ट्रक्चर्ड डेटा देखील व्यवस्थित करू शकते.

Story img Loader