Best Smartwatches Launch in 2022 : स्मार्टफोन प्रमाणे आता लोकांमध्ये स्मार्टवॉच देखील लोकप्रिय होत आहे. वेळ दाखवण्याबरोबरच, ब्लूटूथ कॉलिंग, शंभरावर स्पोर्ट्स मोड आणि फीटनेस संबंधी फीचर्स जसे, हार्ट रेट, ऑक्सीजन लेवल तपासणी इत्यादींमुळे त्या लोकांच्या पंसतीस उतरत असून त्यांची मागणी वाढली आहे. या वर्षी अनेक दमदार स्मार्टवॉच लाँच झाल्यात. अमेझफीटने amazfit falcon हे स्मार्टवॉच लाँच केले. त्याची किंमत अक्षरश: ४४ हजार ९९९ रुपये आहे. हे जीपीएस असलेले घड्याळ असून त्यात फीचर्सही जबरदस्त आहेत. दरम्यान यावर्षीच्या सर्वोत्तम स्मार्ट घड्याळ कोणत्या? त्यांच्यावर एक नजर टाकूया.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
1) अॅपल वॉच सिरीज ७
Apple Watch Series 7 हे मजबूत क्रॅक प्रतिरोधक फ्रंट क्रिस्टलमुळे सर्वात टिकाऊ अॅपल वॉचपैकी एक मानले जाते. आयपी६एक्स डस्ट रेझिस्टंट आणि डब्ल्यूआर ५० वॉटर रेझिस्टंस रेटिंग मिळणारी हे पहिले अॅपल वॉच आहे. या घड्याळात आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि प्रगत डिस्प्ले मिळतो. अधिक स्क्रीन क्षेत्र मिळते आणि पातळ बॉर्डर्स देण्यात आले आहेत. घड्याळ १८ तासांची बॅटरी लाईफ देते आणि फास्ट चार्जिंग मिळते. हे घड्याळ ५० हजार ९०० रुपयांमध्ये लाँच झाले होते.
२) बोट एक्सटेंड स्मार्टवॉच
Boat Xtend Smartwatch मध्ये १.६९ इंच एलसीडी डिस्प्ले आणि जवळपास ५० वॉच फेसेस मिळतात जे बोट अॅपद्वारे वापरता येतात. घड्याळात विविध प्रकारचे सेन्सर्स आणि फिटनेस मॉनिटर्स देण्यात आले आहेत जे तुमचे हार्ट रेट, एसपी ओ २ आणि झोपण्याच्या पद्धतींचा स्वयंचलितपणे किंवा मॅन्युअली मागोवा घेऊ शकतात.
घड्याळीत वॉकिंग, जॉगिंग, सायकलिंग, हाइकिंग, स्विमिंग आणि अनेक मोड्स मिळतात. घड्याळ सिंगल चार्जमध्ये एक आठवडा चालू शकते. घड्याळीला ५ एटीएमचे धूळ आणि पाणी प्रतिरोधक रेटिंग मिळाले आहे. याचा अर्थ हे घड्याळ पाण्यात ३० मिनिटे टिकू शकते. हे घड्याळ ७ हजार ९९० रुपयांमध्ये लाँच झाले होते.
३) सॅमसंग गॅलक्सी वॉच ५ प्रो
Samsung Galaxy Watch 5 Pro या स्मार्टवॉचमधील बॅटरी गॅलेक्सी वॉचमध्ये सर्वात मोठी आहे. घड्याळात १.४ इंचचा राउंड सूपर अमोलेड डिस्प्ले मिळतो. डिस्प्ले पलीकडे पसरलेल्या बेझेलद्वारे संरक्षित आहे. ऑटोमॅटिक ब्राइटनेसमुळे डिस्प्लेवरील मजकूर स्पष्ट दिसून येते. गुगलच्या विअर ओएससह एकत्रीकरणामुळे घड्याळ हलके असून त्यातून गुगल मॅप, गुगल असिस्टंट, गुगल पे, मेसेज इत्यादी फीचर्स वापरता येतात. हे घड्याळ ४८ हजार ९९९ रुपयांमध्ये लाँच झाले होते.
(तुम्हाला हवं ते शोधण्यासाठी संपूर्ण Youtube Video पाहण्याची गरज नाही, गुगल देणार ‘हे’ भन्नाट फीचर)
४) नॉइस कलरफीट प्रो ४
फिटनेसबाबत प्रेम असलेल्यांसाठी Noise Colorfit Pro 4 स्मार्टवॉच फायदेशीर आहे. तुमचे आरोग्य आणि लाइफस्टाइल संबंधी उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी घड्याळात नॉइस हेल्थ सूट आणि प्रोडक्टिव्हिटी सूट देण्यात आले आहे. जे युजर बाहेर उन्हात काम करतात त्यांना ब्राइट आणि स्पष्ट डिस्प्ले आणि डिजिटल क्राऊनमुळे मेन्यू आणि फीचर्स वापरणे सोपे जाते. घड्याळात १०० स्पोर्ट मोड्स मिळतात आणि १५० पेक्षा अधिक क्लाउड बेस्ड आणि अॅनिमेटेड वॉच फेसेस मिळतात. हे घड्याळ ५ हजार ९९९ रुपयांमध्ये लाँच झाले होते.
५) गारमिन फोररनर ५५
Garmin Forerunner 55 हे जीपीएस असलेले घड्याळ आहे. फिटनेस प्रेमींसाठी हे घड्याळ उपयुक्त ठरू शकते. घड्याळ हल्के आणि आरामदायी आहे. यामुळे ते धावताना आणि नियमित वापरासाठी चांगले आहे. घड्याळात स्पोर्टी सिलिकॉन बँड मिळतो. हे घड्याळ २२ हजार ४९० रुपयांमध्ये लाँच झाले होते.