Flipkart Smartphone Shopping is Now Much Safer: हल्ली स्मार्टफोन ऑनलाइन खरेदीचा ट्रेंड वाढला आहे. मात्र, अनेकदा स्मार्टफोन सारखी महागडी वस्तू ऑनलाइन खरेदी करताना ग्राहकांना फसवणुकीला तोंड द्यावे लागते. मागवण्यात आलेल्या स्मार्टफोनऐवजी दुसरीच कोणती वस्तू मिळते. अशा अनेक घटनांच्या बातम्या सुद्धा ऐकू येऊ लागल्या आहेत. त्यामुळे स्मार्टफोन खरेदी करताना लोकांच्या मनात फसवणूकीची भीती निर्माण झाली आहे. पण आता ही भीती बाळगायची गरज नाही. कारण फ्लिपकार्टने ‘इंडिया का स्मार्टफोन डेस्टिनेशन’ नावाची नवीन मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत शॉर्ट व्हिडीओचाही समावेश करण्यात आला आहे, जेणेकरून लोकांना न घाबरता गोष्टी फॅन्सी पद्धतीने समजतील. या मोहिमेच्या माध्यमातून फ्लिपकार्ट सर्वोत्तम स्मार्टफोन डेस्टिनेशन बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.

मोहिमेचा मुख्य उद्देश काय आहे?
या मोहिमेच्या मदतीने फ्लिपकार्टला आपल्या ग्राहकांच्या मनातील भीती दूर करायची आहे जी स्मार्टफोन खरेदी करताना युजर्सच्या मनात असते. या मोहिमेत जोडलेल्या छोट्या व्हिडीओंच्या मदतीने फ्लिपकार्टने भारतीय टीव्ही मालिकांच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला आहे. याशिवाय फ्लिपकार्टच्या मदतीने खरेदी करताना कोणतीही फसवणूक होणार नाही, हे देखील या व्हिडीओच्या मदतीने, फ्लिपकार्ट युजर्सना पटवून द्यायचं आहे.

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
'Gir Mat Jaana': Viral MP Woman's Dance Fails To Impress Netizens funny video goes viral
गावच्या महिलेचा ट्रेंडिंग गाण्यावर तुफान डान्स; मारल्या अशा स्टेप की VIDEO पाहून पोट दुखेपर्यंत हसाल
snake viral video | snake bit video
बापरे! सापाने दंश करताच तरुणाने केलं असं काही की, VIDEO पाहून तुम्हालाही भरेल धडकी
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
neetu kapoor ridhhima kapoor sahni dance on jamal kadu
Video : आई अन् लेकीचा ‘जमाल कुडू’ गाण्यावर डान्स, रिद्धिमा कपूर साहनीबरोबर नीतू कपूर यांनी धरला ठेका; पाहा व्हिडीओ
Shocking viral video of ac local train crowd in Mumbai air conditioned local trains are disappointing shocking video goes viral
एसी ट्रेनचं तिकीट काढताय? मुंबईतल्या रेल्वे स्टेशनवरचा ‘हा’ VIDEO पाहून धडकी भरेल; पाहा नेमकं काय घडलं?
Grandfather shifted the camera towards his wife
“नातं इथपर्यंत पोहचलं… ” आजी येताच आजोबांनी मोबाईल वळवला अन्…; VIRAL VIDEO पाहून नेटकरी झाले भावुक

आणखी वाचा : ड्युअल कॅमेराचा Infinix Smart 6 Plus ८ हजारांपेक्षा कमी किंमतीत लॉंच!

उदाहरणार्थ एका व्हिडीओमध्ये, सासू तिच्या नवविवाहित सुनेला घराच्या आणि लॉकरच्या चाव्या, तसंच जुना तुटलेला स्मार्टफोन देते. यावर तिचा मुलगा उत्तर देतो की तु जुना फोन पत्नीला कशाला दिलास? या व्हिडीओच्या मदतीने फ्लिपकार्ट हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, “वेबसाइटवरून तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन कोणत्याही अडचणीशिवाय एक्सचेंज करू शकता.”

आणखी वाचा : प्रतीक्षा संपली! ५० MP कॅमेरा असलेला Tecno Spark 9T भारतात लॉंच, किंमत १० हजारांपेक्षा कमी

ओपन बॉक्स डिलिव्हरी सुविधा उपलब्ध असेल
या मोहिमेद्वारे, फ्लिपकार्ट केवळ सर्वोत्तम स्मार्टफोनच देणार नाही तर केवळ ९९ रुपयांमध्ये ओपन बॉक्स डिलिव्हरी आणि स्क्रीन रिप्लेसमेंट सारख्या सुविधा देखील देत आहे. ओपन बॉक्स डिलिव्हरीमध्ये फ्लिपकार्टचा एजंट तुमच्यासमोर प्रोडक्ट उघडतो आणि ते तपासतो. त्याची स्क्रीन रिप्लेसमेंट फीचर Apple, Samsung, RealMe, Oppo आणि Google Pixel सारख्या सर्व मोठ्या ब्रँड स्मार्टफोनसाठी उपलब्ध आहे.