Flipkart apple day sale : फ्लिपकार्टवर कालपासून अॅपल डे सेलला सुरुवात झाली आहे. सणासुदीच्या काळात मोठ्या सूटसह आयफोन खरेदी करण्याचे राहिले असेल तर आता तुमच्यासाठी चांगली संधी आहे. या सेलमध्ये फ्लिपकार्टकडून, डिस्काउंट, बँक ऑफर्स, नो कॉस्ट ईएमआय आणि काही आयफोन्सवर डिस्काउंट योजना आहेत. २० नोव्हेंबरपर्यंत तुम्ही या सेलचा फायदा घेऊ शकता.
सेलमधील या आहेत सर्वोत्तम डिल्स
१) आयफोन १२ मिनी
सेलमध्ये आयफोन १२ मिनीवर मोठी सूट मिळत आहे. iPhone 12 mini चा ६४ जीबी बेस व्हेरिएंट ३८ हजार ९९९ रुपयांच्या सवलतीच्या दरात मिळत आहे. फोन खरेदीसाठी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकचे कार्ड वापरल्यास ५ टक्के कॅशबॅकचा लाभ मिळतो. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनवर १७ हजार ५०० रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. फोनमध्ये ए १४ बायोनिक चिपसेट, ५.४ इंच सुपर रेटिना डिस्प्ले, ५ जी कनेक्टिव्हिटी, मागे १२ एमपीचे दोन कॅमेरे आणि पुढे सेल्फीसाठी १२ एमपीचा एक कॅमेरा देण्यात आला आहे.
(ग्राहकाला मिळाला न्याय! ‘ZOMATO’ला ८ हजार ३६२ रुपयांच्या भरपाईचे आदेश)
२) आयफोन १३
सेलमध्ये iPhone 13 १२८ जीबी बेस व्हेरिएंट ६४ हजार ९९९ रुपयांच्या सवलतीच्या दरात उपलब्ध आहे. फोन खरेदीसाठी फ्लिपकार्ट अॅक्सिस बँकचे कार्ड वापरल्यास ५ टक्के कॅशबॅकचा लाभ मिळतो. एक्सचेंज ऑफरमध्ये या फोनवर १७ हजार ५०० रुपयांपर्यंतची बचत होऊ शकते. फोनमध्ये ए १५ बायोनिक चिपसेट, ६.१ इंच सुपर रेटिना एक्सआरडी डिस्प्ले, ५ जी कनेक्टिव्हिटी, मागे १२ एमपीचे दोन कॅमेरे आणि पुढे सेल्फीसाठी १२ एमपीचा एक कॅमेरा देण्यात आला आहे.
३) आयफोन १४
iPhone 14 ७४ हजार ९९० रुपयांच्या सवलतीच्या दरात मिळत आहे. यामध्ये एचडीएफसी बँक कार्ड आणि ईएमआय ट्रानझॅक्शनवर मिळणाऱ्या ५ हजार रुपयांच्या तातडीच्या डिस्काउंटचा देखील समावेश आहे. फोनमध्ये ए १५ बायोनिक प्रोसेसर आणि ६.१ इंचची सुरपर रेटिना एक्सडीआर स्क्रिन मिळते.
(एकापेक्षा अधिक स्मार्टफोनवर चालवता येईल एकच व्हॉट्सअॅप खाते, जाणून घ्या कसे)
४) आयफोन १४ प्लस
iPhone 14 Plus हा स्मार्टफोन ८४ हजार ९०० रुपयांपासून उपलब्ध आहे. यामध्ये एचडीएफसी कार्डच्या वापरावर मिळणाऱ्या ५ हजार रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंटचा देखील समावेश आहे. फोनमध्ये ६.७ इंच सुपर रेटिना एक्सडीआर स्क्रिन मिळत असून मागे दोन कॅमेरे मिळतात. दोन्ही कॅमेरे १२ एमपीचे असून सेल्फीसाठी पुढे १२ एमपीचा कॅमेरा मिळतो.