Filpkart Big Bachat Dhamaal Sale 2023: फ्लिपकार्ट ही भारतातील लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट आहे. या वेबसाइटवर १९ मे पासून बिग बचत धमाल सेल २०२३ ला सुरुवात झाली आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये अनेक गोष्टींवर चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. यात स्मार्टफोन्सवर देखील तगडा डिस्काउंट मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही जास्त पैसे खर्च न करता लेटेस्ट मॉडेल्सचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर या धमाकेधार सेलमधून फोन विकत घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल. स्मार्टफोन्ससह स्मार्टवॉच, इअरफोन आणि अन्य विद्युत उपकरणांचाही फ्लिपकार्टच्या सेलमध्ये समावेश करण्यात आला आहे.

फ्लिपकार्टच्या बिग बचत धमाल सेल २०२३ मध्ये कोणत्या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत आहे?

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Viral Video of Desi Jugaad
VIRAL VIDEO: जुगाड तर बघा! बॅनर लावून तयार केली सायकल, तीन मित्र बसले ऐटीत अन् निघाली स्वारी
How will state boards mobile app be useful for students parents and teachers
राज्य मंडळाचे मोबाइल अॅप विद्यार्थी, पालक, शिक्षकांना कसे ठरणार उपयुक्त?
Loan App Harassment
Loan App Scam: दोन हजारांच्या कर्जासाठी पत्नीचे फोटो मॉर्फ करत व्हायरल केले, लोन App च्या छळवणुकीला कंटाळून पतीची आत्महत्या
Alia Bhatt
आलियाची लेक राहा कपूर आजीला कोणत्या नावाने मारते हाक? सोनी राजदान म्हणाल्या…
All about the new wedding invite scam on WhatsApp
सायबरचोरांचे नवे शस्त्र… डिजिटल लग्नपत्रिका! फसवणूक कशी? खबरदारी कोणती?
Men walking with billboard of food delivery app in Bengaluru netizens not amused by marketing campaign
मार्केटिंगसाठी काहीही! फूड डिलिव्हरी ॲपचे बिलबोर्ड घेऊन रस्त्यावर फिरत आहे पुरुष, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी

Google Pixel 7a

गुगल कंपनीचा Google Pixel 7a या स्मार्टफोनची फ्लिपकार्टच्या सेलमध्ये किंमत ४३,९९९ रुपये इतकी आहे. मोबाइल फोनवर ३४,००० रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट आहे. त्याशिवाय एचडीएफसी बॅंकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर ४,००० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. गुगलच्या या फोनमध्ये ६.१ इंच डिस्प्ले, ४३०० एमएएच बॅटरी आणि ६४ एमपी कॅमेरा यांचा समावेश आहे.

iPhone 14

अ‍ॅपलच्या iPhone 14 वर फ्लिपकार्टच्या सेलमध्ये ३३,००० रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट आणि ४,००० रुपयांचा बॅंक डिस्काउंट दिला जात आहे. या आयफोनची मूळ किंमत ६९,९९९ रुपये आहे. या फोनमध्ये ६.१ इंच सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले, ए१२ बायोनिक चिपसेट आणि १२ एमपी प्रायमरी कॅमेरा असे फीचर्स आहेत.

Oppo Reno 8 Pro 5G

Oppo Reno 8 Pro 5G हा फोन तुम्ही फ्लिपकार्टच्या बिग बचत धमाल सेल २०२३ मधून ४५,९९९ रुपयांना खरेदी करु शकता. कोटक महिंद्रा कार्ड ईएमआय ट्रान्सक्शन केल्यास या स्मार्टफोन १० टक्क्यांचा डिस्काउंट दिला जाईल. या फोनमध्ये ६.७ इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले, मीडियाटेक डायमेंन्शन ८१०० मॅक्स प्रोसेसर, ४५०० एमएएच बॅटरी आणि ५० एपी प्रायमरी कॅमेरा आहे.

आणखी वाचा – Elon Musk यांच्या ‘त्या’ निर्णयानंतर Twitter झाले अपडेट; पण यामुळे यूजर्स का म्हणत आहेत R.I.P. Youtube?

Poco F5 5G

पोको कंपनीचा Poco F5 5G हा स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या सेलमध्ये फक्त २९,९९९ रुपयांना खरेदी करता येणार आहे. या फोनवर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बॅंकेच्या कार्डवरील बॅंक डिस्काउंट दिले जाणार आहे. Poco F5 5G या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाची एफएचडी प्लस स्क्रीन, ६४ एमपी प्रायमरी कॅमेरा, ५००० एमएएच क्षमता असलेली बॅटरीसह क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७+ जन २ प्रोसेसर सपोर्ट अशा गोष्टी आहेत.

Story img Loader