Flipkart Big Billion Day Sale New Update : सणासुदीच्या काळात आपल्यातील अनेक जण फ्रिजपासून ते नवीकोरी कार खरेदी कारण्यापर्यंतचे स्वप्न पाहत असतात. म्हणूनच विविध कंपन्या ग्राहकांसाठी भरपूर ऑफर्स व डिस्काउंट असणारे सेल घेऊन येत असतात. अशातच काही दिवसांपूर्वी फ्लिपकार्टने आगामी बिग बिलियन डेज सेलची (Flipkart Big Billion Day Sale) घोषणा केली होती. हा सेल २६ सप्टेंबरपासून सुरू होईल. तर यादरम्यान सॅमसंग गॅलॅक्सी तुमच्यासाठी खास ऑफर घेऊन आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय असणार ही ऑफर? (Flipkart Big Billion Day Sale Offer)

सॅमसंगने गॅलॅक्सी ए१४ ५जी (Galaxy A14 5G) स्मार्टफोनसाठी ऑफर जाहीर केल्या आहेत. ग्राहक २६ सप्टेंबरपासून बिग बिलियन डेज सेलमध्ये (त्यांचा आवडता ५जी स्मार्टफोन ४जीबी प्लस १२८ जीबी (4GB + 128GB) व्हेरियंट ९,९९९ रुपये किमतीत खरेदी करू शकणार आहेत. या डीलमध्ये तुम्हाला १७,४९९ रुपयांना मिळणारा मोबाईल ६,५०० रुपयांची सूट व १००० च्या इन्स्टंस्ट सूटसह दिला जाईल. तसेच ६जीबी प्लस १२८ जीबी (6GB + 128 GB) व्हेरिएंट फक्त १०,९९९ रुपयांच्या किमतीत खरेदी करता येणार आहे. २०,९९९ रुपये किमतीत उपलब्ध असणाऱ्या या व्हेरिएंटवर तुम्हाला ९,००० रुपयांची नियमित सवलत आणि १,००० रुपयांची इन्स्टंट सूटही उपलब्ध असेल.

हेही वाचा…Big Billion Days Sale 2024 : ‘या’ चार स्मार्टफोन्स ब्रॅण्डवर कॅशबॅक, स्मार्ट टीव्ही, फ्रिजवर सूट; कोणत्या वस्तूवर नेमकी किती सूट? जाणून घ्या

फीचर्स :

गॅलॅक्सी ए१४ ५जी मध्ये 50MP ट्रिपल रिअर कॅमेरासह सॅमसंग गॅलेक्सीचा सिग्नेचर फ्लोटिंग कॅमेरा डिझाइन अंतर्भूत आहे; ज्यामध्ये हाय क्वालिटी फोटोंसाठी मॅक्रो लेन्ससह डॉल्बी ॲटमॉस सपोर्टसह ६.६ इंच फूल एचडी प्लेस डिस्प्ले आहे. त्याचप्रमाणे Galaxy A14 5G डार्क रेड, लाईट ग्रीन व ब्लॅक आदी रंग पर्यायांसह उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये Exynos १३३० प्रोसेसर आहे.

Galaxy A14 5G स्मार्टफोन सॅमसंगच्या अद्वितीय ‘व्हॉइस फोकस’ फीचर्ससह सुसज्ज आहे; जे गडबड वा गोंधळ असलेल्या ठिकाणी फोनवरील संवाद स्पष्ट ऐकू येईल या उद्देशाने, आजूबाजूचा आवाज फिल्टर करून कॉलदरम्यान आवाजाची गुणवत्ता टिकविण्यास मदत करते. हे फीचर गुगल मीट, मायक्रोसॉफ्ट टीम्स, व्हॉट्सॲप, झूम यांसारख्या व्हिडीओ, व्हॉईस कॉलिंग ॲप्सवरदेखील तुम्ही वापरू शकता; ज्यामुळे युजर्सचा अनुभव आणखी छान होईल, असे कंपनीने एका प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. त्याशिवाय, intuitive One UI 6 सॉफ्टवेअरसह युजर्स व्हिडीओ वॉलपेपर किंवा इमोजीसह लॉक स्क्रीन कस्टमाइज करू शकतात. युजर्स वैयक्तिक संपर्कांसाठी अवतारांसह (Avtar) कॉल बॅकग्राऊंडदेखील तयार करू शकतात. जर तुम्हाला ही ऑफर योग्य वाटत असेल, तर तुम्ही २६ तारखेपासून सुरू होणाऱ्या बिग बिलियन डेज सेलमध्ये (Flipkart Big Billion Day Sale) हा स्मार्टफोन खरेदी करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flipkart big billion day sale 2024 offers samsung galaxy a14 5g to be available at lower price check offers and discount details asp