Flipkart Big Billion Days Sale: सणासुदीचा हंगाम सध्या सुरू झाला आहे. नुकताच गणेशोत्सव पार पडला आणि आता नवरात्री, दसरा, दिवाळी असे सण येऊ घातले आहेत. सण असला की नवी-कोरी वस्तू घेण्याचा मोह कोणालाच आवरत नाही. सणाचं हेच औचित्य साधून अनेक ब्रॅण्ड्स त्यांच्या प्रॉडक्ट्सवर डिस्काउंट देणाऱ्या ऑफर्स जाहीर करतात.

ऑनलाइन आणि ऑफलाइन खरेदीवर सणासुदीला जरा जास्तच डिस्काउंट असतं. अशातच आता फ्लिपकार्टच्या ‘Big Billion Days’ची सुरुवात झाली आहे. अनेक वर्षांपासून प्रसिद्ध असलेला फ्लिपकार्टचा ‘बिग बिलियन डेज’ सेल आजपासून प्लस मेंबर्ससाठी लाइव्ह झाला आहे. तसेच उद्यापासून म्हणजेच २७ सप्टेंबरपासून फ्लिपकार्टचा हा भव्य सेल सगळ्यांसाठी सुरू होईल.

हेही वाचा… iPhone 16 लाँच होताच अ‍ॅपलने बंद केले ‘हे’ बहुचर्चित आयफोन्स, नेमके कारण काय? घ्या जाणून

दरवर्षी फ्लिपकार्ट ही कंपनी ‘Big Billion Days’ सेलमधून सर्व कॅटेगरीजसाठी डील्स आणि डिस्काउंट्स ऑफर करते. अगदी लहान-सहान गोष्टींपासून ते मोठमोठ्या उपकरणांपर्यंत सगळ्यावर काही ना काही ऑफर नक्कीच असते. तसंच तरुणाई या सेलमधून स्मार्टफोन खरेदी करण्यावर जास्त भर देते. यादरम्यान अनेक कार्ड ऑफर्स, बँक ऑफर्स आणि ईएमआयवर डिस्काउंट्स मिळाल्याने ग्राहकांना कमी किमतीत वस्तू खरेदी करण्याचे समाधान मिळविता येते. स्मार्टफोनप्रमाणेच आयफोनचीही क्रेझ तरुणाईत वाढत चाललीय. त्यामुळे या सेलची प्रतीक्षा करणाऱ्यांचं लक्ष आयफोनच्या किमतीकडे जरा जास्तच आहे.

नुकतीच iPhone16ची सीरिज लाँच झाल्यामुळे आता आयफोनच्या आधीच्या मॉडेल्सच्या किमतीत घसरण झाली आहे. तसेच या सेलमध्ये अनेक ऑफर्स असल्याने आयफोन अधिक स्वस्त दरात मिळू शकतो.

Flipkart Big Billion Days Sale: iPhone 15

फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने आयफोनवरील काही ऑफर्स जाहीर केल्या आहेत; तर काही ऑफर्स सेल सुरू झाल्यावर जाहीर करण्यात येतील. त्यात आयफोन १५, आयफोन १५ प्लस, आयफोन १५ प्रो, आयफोन १५ प्रो मॅक्स यांच्या किमती किती आहेत ते पाहूया.

५०,००० च्या आत आयफोन १५

गेल्या वर्षी अ‍ॅपलने ७९,९९० रुपयांना आयफोन १५ लाँच केला होता. फ्लिपकार्टचा हा सेल उद्यावर आला असून, फ्लिपकार्टने अद्याप याची किंमत जाहीर केलेली नाही. परंतु, त्यांनी एक हिंट दिली आहे; ज्यात, आयफोन १५ ची किंमत ५०,०००च्या आत असणार आहे हे कळते. ४,९९९ अशी किंमत दाखवून ग्राहकांना फ्लिपकार्टने हा क्लू दिला आहे.

हेही वाचा… आयफोन १६ सीरिज एआयसह झाली लाँच, ४८ मेगापिक्सेल कॅमेरा अन्…; जाणून घ्या फीचर्स, किंंमत आणि बरंच काही…

सवलतीच्या दरात आयफोन १५ प्लस

आयफोन १५ प्लसची ऑफर प्राईज अद्याप फ्लिपकार्टने जाहीर केलेली नाही. हा फोन ८९,९९९ रुपयांना लाँच करण्यात आला होता आणि आता तो ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्सवर ७३,९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

आयफोन १५ प्रो ९०,००० पेक्षा कमी किमतीत

फ्लिपकार्टने असेही घोषित केले आहे की, १,३४,९९० रुपयांना लाँच करण्यात आलेला आयफोन १५ आता ८९,९९९ रुपयांना उपलब्ध होईल.

आयफोन १५ प्रो मॅक्सवर मोठी सवलत

गेल्या वर्षीचा सर्वांत महागडा आयफोन म्हणजेच आयफोन १५ प्रो मॅक्स फ्लिपकार्ट ‘बिग बिलियन डेज २०२४’ सेलदरम्यान १,०९,९९० रुपयांना उपलब्ध असेल. हा फोन १,५९,९९० रुपयांना लाँच करण्यात आला होता.