Flipkart ने १३ सप्टेंबर २०२२ रोजी बिग बिलियन डेज सेलच्या ९व्या एडिशनची तारीख देखील जाहीर केली आहे. Flipkart Big Billion Days येत्या २३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अॅमेझॉन ग्रेट इंडिया फेस्टिव्हल सेल देखील २३ सप्टेंबरपासून सुरू होईल. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत चालेल. फ्लिपकार्टने माहिती दिली आहे की, सेल सुरू होण्याआधी यूजर्स १ रुपये भरून इलेक्ट्रॉनिक्स, घर, सौंदर्य यासह अनेक कॅटेगरीच्या प्रोडक्ट्सची अॅडव्हान्स बुकिंग करू शकतील. येत्या सेलमध्ये आपण नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी २० हजाराच्या खालील काही स्वस्त, ऍडव्हान्स पर्याय आपण आज पाहणार आहोत.
आठ दिवसांच्या सेल दरम्यान, Pixel 6a, Nothing Phone 1, Oppo F19 Pro+ 5G, Realme 9 Pro 5G आणि सारखे अनेक हाय-एंड स्मार्टफोन स्वस्त दरात उपलब्ध होईल. फ्लिपकार्टने आयसीआयसीआय बँक आणि ऍक्सिस बँक यांच्याशी भागीदारी केली आहे जेणेकरून ग्राहकांना विक्रीदरम्यान केलेल्या सर्व खरेदीवर १०% त्वरित सूट देण्यात येईल.
बिग बिलियन डेज सेलमध्ये २०,००० हुन कमी दरात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनवरील डील पाहूया.
1) शाओमी ११ हायपरचार्ज ५जी: बिग बिलियन डेज सेल मध्ये शाओमी ११ हा स्मार्टफोन १९हजार ९९९ मध्ये उपलब्ध आहे.
Xiaomi 11 i हायपरचार्ज 5G वैशिष्ट्ये
- 6 GB रॅम | 128 GB ROM | 1 TB पर्यंत विस्तार शक्य
- 16.94 सेमी (6.67 इंच) फुल HD+ AMOLED डिस्प्ले
- 108MP + 8MP + 2MP | 16MP फ्रंट कॅमेरा
- 4500 mAh ली-पॉलिमर बॅटरी
- Mediatek Dimensity 920 प्रोसेसर
2) Oppo F19 Pro+ 5G: फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल दरम्यान तुम्हाला १५ हजार ९९० रुपयांच्या सवलतीच्या किमतीवर Oppo F19 Pro+ 5G मिळू शकेल.
Oppo F19 Pro+ 5G. वैशिष्ट्ये
- 6.43″ इंच (16.3cm) FHD+ सुपर AMOLED पंच-होल डिस्प्ले 2400×1080 पिक्सेलसह.
- Mediatek Dimensity 800U 5G ड्युअल 5G किंवा 4G सिमला सपोर्ट करते.
- शक्तिशाली 2.4 GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर, सपोर्ट LPDDR4x मेमरी आणि नवीनतम UFS 2.1 स्टोरेज.
- 50W फ्लॅश चार्जिंग तंत्रज्ञानासह 4310 mAH लिथियम पॉलिमर बॅटरी.
- 48MP क्वाड कॅमेरा (48MP मुख्य + 8MP वाइड अँगल मॅक्रो + 2MP पोर्ट्रेट मोनो लेन्स + 2MP मॅक्रो मोनो लेन्स), 16MP फ्रंट कॅमेरा.
मेमरी, स्टोरेज आणि सिम: 8 जीबी रॅम, 128 जीबी इंटरनल मेमरी 256 जीबी पर्यंत वाढवता येणारी, ड्युअल सिम (नॅनो) ड्युअल-स्टँडबाय (डिव्हाइससाठी 1 वर्षाची मॅन्युफॅक्चरर वॉरंटी आणि बॅटरीसह इन-बॉक्स अॅक्सेसरीजसाठी 6 महिन्यांची मॅन्युफॅक्चरर वॉरंटी)
3) Moto G82 5G बिग बिलियन डेज सेल दरम्यान फ्लिपकार्टवर १८ हजार ४९९ च्या सवलतीच्या किमतीवर उपलब्ध असेल.
Moto G82 5G वैशिष्ट्ये
- 8 GB रॅम | 128 GB ROM | 1 TB पर्यंत विस्तार शक्य
- 16.76 सेमी (6.6 इंच) फुल HD+ डिस्प्ले
- 50MP + 8MP + 2MP | 16MP फ्रंट कॅमेरा
- 5000 mAh लिथियम बॅटरी
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 5G प्रोसेसर
4) Realme 9 Pro 5G फ्लिपकार्ट सेलमध्ये स्मार्टफोन १४ हजार ९९९ च्या सवलतीच्या दरात उपलब्ध होईल.
Realme 9 Pro 5G वैशिष्ट्ये
- 6 GB रॅम | 128 GB ROM | 256 GB पर्यंत विस्तार शक्य
- 16.76 सेमी (6.6 इंच) फुल HD+ डिस्प्ले
- 64MP + 8MP + 2MP | 16MP फ्रंट कॅमेरा
- 5000 mAh ली-आयन बॅटरी
- क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर
दरम्यान, Samsung Galaxy S22+ आणि S22, Galaxy Z Fold3 आणि Flip3 तसेच Galaxy M आणि F मालिकेतील स्मार्टफोन्सच्या संपूर्ण श्रेणीवर येत्या दसऱ्याच्या सेलमध्ये मोठी ऑफर मिळण्याची शक्यता आहे.