Flipkart Big Diwali Sale Goes Live : फ्लिपकार्ट ‘बिग दिवाळी सेल’ (Flipkart Big Diwali Sale) आज २१ ऑक्टोबरला सुरू झाला आहे. अर्थात, त्यामध्ये ‘प्लस मेंबर्स’ना २० ऑक्टोबरपासूनच प्रवेश देण्यात आला आहे. हा सेल अलीकडील ‘बिग बिलियन डेज सेल’प्रमाणेच स्मार्टफोन्सवर ऑफर्स देणार आहे. फ्लिपकार्टचा दावा आहे की, अत्यंत कमी किमतीत स्मार्टफोन मिळविण्याची ही अंतिम संधी तुमच्याकडे चालून आली आहे. कारण- हा सेल २१ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. या सेलदरम्यान तुम्हाला केवळ स्मार्टफोनवरच नाही तर स्मार्ट टीव्ही, लॅपटॉप, टॅबलेट व ॲक्सेसरीज यांसारख्या विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवरही सूट मिळणार आहे.

तुम्ही फ्लिपकार्ट ‘बिग दिवाळी सेल’ (Flipkart Big Diwali Sale) मध्ये एसबीआय (SBI) कार्डद्वारे एखादी वस्तू खरेदी केल्यास, तुम्हाला १० टक्के कॅशबॅक किंवा सवलतीचा आनंद मिळू शकतो. तसेच, फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक कार्ड वापरल्यास कोणत्याही खरेदीवर अतिरिक्त पाच टक्के अमर्यादित कॅशबॅकसुद्धा मिळेल.

How To Avoid Scams During Diwali
How To Avoid Scams : डिजिटल फ्रॉडपासून सावध राहा; नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनचा सल्ला वाचा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
who is OpenAI's first chief economist
OpenAI’s First Chief Economist : OpenAIचे पहिले-वहिले मुख्य अर्थतज्ज्ञ! कोण आहेत आरोन चॅटर्जी? जाणून घ्या तीन मुद्द्यांमध्ये
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
AI chatbots like ChatGPT and Perplexity can also be used as search engines
Chromeवर Google Searchऐवजी ChatGPT आणि Perplexity AI कसे बदलावे? जाणून घ्या सोपी पद्धत
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
The new Jio Diwali offers are valid until 5 November 2024
Jio Diwali Dhamaka Offer : जिओच्या ‘या’ दोन रिचार्जवर मिळणार डिस्काउंट कूपन; ३,३५० रुपयांच्या फायद्यासाठी कूपन कसं मिळवायचं ते बघा
Apple exports iPhone
Make in India : ६ अब्ज डॉलर्सच्या ‘आयफोन्स’ची चीन नाही, भारतातून निर्यात

कमी किमतीत उपलब्ध असलेल्या लोकप्रिय स्मार्टफोन्सची यादी खालीलप्रमाणे (Flipkart Big Diwali Sale Smartphones List) :

१. मोटोरोला जी८५ ५जी स्मार्टफोन १५ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.

२. सॅमसंग गॅलॅक्सी एस२३ ५जी स्मार्टफोन ३७ हजार ९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे.

३. रिअलमी १२ एक्स ५जी स्मार्टफोन सात हजार रुपयांच्या सवलतीसह १० हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

४. ओपो के१२ एक्स ५ जी स्मार्टफोन सहा हजार रुपयांच्या सवलतीसह १० हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

५. सीएमएफ फोन सात हजार ५०० रुपयांच्या रुपयांच्या सवलतीसह १२ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

हेही वाचा…WhatsApp Chat Memory Feature : लवकरच व्हॉट्सॲप होणार तुमचा पर्सनल असिस्टंट, तुमच्या आवडीनिवडी ठेवणार लक्षात, पाहा कसं वापरायचं नवं फीचर

६. पोकोचा एफ६ ५जी हा ३३ हजार ९९ रुपये इतकी मूळ किंमत असलेला फोन तुम्हाला २२ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

७. विवो टी३ ५जी फोनची किंमत सात हजार रुपयांच्या सवलतीसह १५ हजार ९९९ रुपयांना उपलब्ध आहे.

. सॅमसंग गॅलॅक्सी एस २३ एफईची किंमत २८ हजार ९९९ रुपये आहे.

९. गूगल पिक्सेल ८ हा ७५ हजार ९९९ रुपये इतक्या मूळ किमतीपासून सुरू होणारा फोन तुम्हाला या सेलमध्ये ३६ हजार ४९९ रुपयांना खरेदी करता येईल.

१०. रिअलमी पी२ प्रो ५ जी सात हजार रुपयांच्या सवलतीसह १८ हजार ९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे.

दरम्यान, ॲमेझॉन २७ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलच्या आधारे दिवाळी स्पेशल सेलचेही आयोजन करण्यात येत आहे. या सेलअंतर्गत सॅमसंग, रिअलमी, वनप्लस, आयक्यूओओ व ॲपल यांसह विविध ब्रँड्सच्या स्मार्टफोन्सवर भरघोस सूट देण्यात येणार आहे. या ऑफरव्यतिरिक्त ग्राहक १० टक्क्यांपर्यंत मिळणाऱ्या बँक सूटचादेखील आनंद घेऊ शकतात.

Story img Loader