ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ग्राहकांसाठी अनेक वेळा बिग सेलचे आयोजन करत असते, ज्यावर लोकांना जास्त सवलतीत वस्तू विकल्या जातात. याच प्रमाणे आता १२ मार्चपासून ई-कॉमर्स साइटवर फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल २०२२ पासून सुरू होत आहे, जो १६ मार्चपर्यंत चालणार आहे. जर तुम्हाला इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सपासून ते स्मार्टफोन्स आणि इतर उपकरणे किंवा उत्पादने खरेदी करायची असतील तर तुम्ही येथून काही सवलतीच्या दरात खरेदी करू शकता. तर या सेल मध्ये तुम्हाला कोणत्या उत्पादनांवर किती सूट मिळेल हे जाणून घ्या.
Flipkart हा सेल ग्राहकांसाठी लाईव्ह करणार आहे आणि प्लस सदस्यांसाठी २४ तास आधी Axis सुरू करेल. यासोबतच कंपनीने SBI बँकेशी करार केला आहे. ज्या अंतर्गत SBI क्रेडिट कार्ड वापरण्यावर १० टक्क्यांपर्यंत सूट दिली जाणार आहे.
या उपकरणांवर मिळणार बंपर सूट
Apple, Realme, Poco आणि Samsung सारख्या कंपन्यांच्या फोनवर ८० टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. याशिवाय, स्मार्ट घड्याळे, फिटनेस बँड यांसारख्या स्मार्ट वेअरेबल उत्पादनांवर ६० टक्क्यांपर्यंत सूटदेण्यात येणार आहे. तर या सेलमध्ये ग्राहकांना Realme, Redmi, Honor, Pebble, Samsung इत्यादींचे स्मार्टवॉच विक्रीसाठी उपलब्ध असतील. तसेच ४० टक्के सूट देऊन लॅपटॉप खरेदी करता येईल.
स्मार्टफोनवर डील
फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल २०२२ मध्ये मोबाईल, टॅब्लेट, कॅमेरा, लॅपटॉप, टीव्ही, फॅशन डील्ससह इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि घरगुती आणि स्वयंपाकघरातील उत्पादनांसह सर्व गोष्टींवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यात येणार आहे. मोबाईल फोन्सबद्दल बोलायचे झाले तर त्यांना ४० टक्यांपर्यंत सूट दिले जाणार आहे.
या सुविधाही होणार उपलब्ध
मोबाईल फोन खरेदी केल्यावर, वापरकर्त्यांना या सेल दरम्यान नो कॉस्ट ईएमआय, बेस्ट एक्सचेंज डील, फ्लिपकार्ट स्मार्ट अपग्रेड, संपूर्ण मोबाइल प्रोटेक्शन यासह अनेक गोष्टींमध्ये सुविधा देण्यात येणार आहे. फ्लिपकार्टच्या या आगामी सेल दरम्यान, वापरकर्त्यांना फक्त २९९ रुपयांमध्ये मोबाईल स्क्रीन केअर प्लॅनची संपूर्ण सुविधा देखील दिली जाईल.