Flipkart Big Saving Days Sale 2022 : फ्लिपकार्टने बिग सेव्हिंग डेज सेलची घोषणा केली आहे. बिग सेव्हिंग डेज सेल २३ जुलैपासून ई-कॉमर्स वेबसाइटवर २७ जुलैपर्यंत सुरू होईल. या सेलमध्ये ग्राहकांना स्मार्टफोन तसेच हेडफोन, स्पीकर आणि टीव्ही यांसारख्या इतर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्सवर उत्तम डील आणि सवलतीच्या ऑफर मिळतील. सेलमध्ये Moto G31, iPhone 11 आणि Oppo Reno 5 Pro सह इतर अनेक स्मार्टफोन्सवर बंपर ऑफर उपलब्ध असतील. Amazon India ने आधीच प्राइम डे सेलची घोषणा केली आहे जी २३ ते २४ जुलै दरम्यान चालेल.

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलबद्दल बोलायचे झाले तर, घरगुती ई-कॉमर्स साइटवर एक मायक्रोसाइट तयार केली गेली आहे, ज्यावर सेलमध्ये सवलतीत उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्सची माहिती आहे. यामध्ये Motorola, Vivo, Oppo आणि Apple च्या डिव्हाईसचा समावेश आहे. फ्लिपकार्ट या सेलमध्ये मर्यादित कालावधीची डील देखील देईल.

आणखी वाचा : २५,००० रूपयांमध्ये नवीन लॅपटॉप लॉंच, Infinix InBook X1 Neo मध्ये फास्ट चार्जिंगसह ‘हे’ आहेत फिचर्स…

फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलमध्ये हेडफोन आणि स्पीकर सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ७० टक्के सूट दिली जाईल. तसंच स्मार्टवॉचवर ६५ टक्के सूट, तर राउटर, माइक, कीबोर्डवर ४५ टक्क्यांपर्यंत सूट मिळेल. २०,७४९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीपासून टीव्ही या सेलमध्ये खरेदी करता येईल. दररोज १२ वाजता सकाळी ८ आणि संध्याकाळी ४ वाजता सेलमध्ये नवीन डील उपलब्ध होतील.

याशिवाय १९ जुलै रोजी दुपारी २ वाजल्यापासून अर्ली बर्ड स्पेशल डील्स देखील असतील. फ्लिपकार्टच्या म्हणण्यानुसार, हे प्रोडक्ट्स आजपर्यंतच्या सर्वात कमी किमतीत दुपारी १२ ते रात्री १० दरम्यान उपलब्ध केले जाईल.

आणखी वाचा : Vivo T1X स्पेसिफिकेशन्स लॉंचपूर्वीच लीक, जाणून घ्या माहिती

सवलतीबद्दल बोलायचे झाल्यास आतापर्यंत ई-कॉमर्स साईटने फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेलच्या कोणत्याही स्पेशल ऑफरबद्दल माहिती दिलेली नाही. क्रेडिट आणि डेबिट कार्डसह बँकेच्या ऑफर इन्स्टंट डिस्काउंट आणि ईएमआय ट्रान्झॅक्शन ऑफर या सेलमध्ये मिळतील अशी अपेक्षा आहे.

Story img Loader