Flipkart ही एक ई-कॉमर्स साईट आहे. यावरून तुम्ही तुम्हाला हव्या त्या गोष्टींची खरेदी करू शकता. तसेच ऑनलाईन स्वरूपात वस्तूंची खरेदी केल्यास तुम्हाला त्यावर डिस्काउंट देखील मिळतो. फ्लिपकार्ट आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन सेल लॉन्च करत असते. असाच एक सेल फ्लिपकार्ट सुरु करणार आहे. लवकरच Flipkart Big Savings Days Sale चे आयोजन करणार आहे. यामध्ये अनेक प्रॉडक्ट्सवर तुम्हाला भरघोस सूट देखील मिळणार आहे.

Flipkart चा हा Big Savings Days Sale ४ मे २०२३ पासून दुपारी १२ वाजता सुरु होणार आहे. यामध्ये तुम्हाला मॉनिटर्स, वॉशिंग मशीन, एसी आणि स्मार्टफोन्स सारख्या अनेक प्रॉडक्ट्सवर तुम्हाला मोठ्या प्रमाणात सूट मिळणार आहे. आज आपण ३०,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीमधील काही स्मार्टफोन्स पाहणार आहोत जे तुम्ही या सेलमध्ये खरेदी करू शकता.

ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
ऑनलाइन वीजबिल भरा; स्मार्ट फोन, स्मार्ट वॉच जिंका!
economic survey nuances
Economic Survey: आर्थिक सर्वेक्षण अहवाल सांगतोय २०२५ हे…
Airtel vs Jio vs Vi Recharge Plans
Airtel vs Jio vs Vi: फक्त कॉल आणि एसएमएस रिचार्जकरिता कोण देत आहे सर्वात स्वस्त प्लॅन? रोजचा खर्च येईल फक्त ५ रुपये
Reliance Jio Rs 458, Rs 1,958 voice and SMS-only plans launched to abide by TRAI’s guidelines
जिओ यूजर्ससाठी आनंदाची बातमी! ३६५ दिवसांच्या वॅलिडीटीचे ‘हे’ २ सर्वात स्वस्त प्लॅन एकदा पाहाच
Without internet recharge plans Airtel Jio Vi launches voice and sms only recharge plans cheapest prepaid recharge plans
घरात वायफाय असणाऱ्यांसाठी Airtel-Jio-Vi चा जबरदस्त प्लॅन! दिवसाला फक्त ५ रुपये खर्च, जाणून घ्या किंमत किती
China Chinese Artificial Intelligence startup DeepSeek
अमेरिकेच्या ‘टुकार’ चिपनिशी चीनचा भन्नाट तंत्राविष्कार…चायना-मेड ‘DeepSeek’ चॅटबोटने जगभर खळबळ का उडवली?
Airtel 90-Day Recharge Plan
Airtel चा स्वस्तात-मस्त प्लॅन! डेटा-कॉलिंगसह मिळणार भरपूर फायदे; केवळ इतक्या किंमतीत मिळेल ९० दिवसांची व्हॅलिडिटी
Republic Day Sale Realme GT 6 Get massive discount
Republic Day Sale : रिअलमीच्या ‘या’ स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट; मिळवा सात हजारांपर्यंतची सवलत

हेही वाचा : BSNL युजर्ससाठी आनंदाची बातमी! लवकरच मिळणार ‘ही’ सेवा; जाणून घ्या

Realme GT Neo 3T

Realme GT Neo 3T स्मार्टफोनमध्ये Snapdragon 870 चिपसेट देण्यात आला आहे. फोनमध्ये ८ GB रॅम उपलब्ध आहे. याशिवाय रॅम ५ जीबीपर्यंत वाढवण्याचा पर्यायही आहे. फोनमध्ये १२८ GB आणि २५६ GB इनबिल्ट स्टोरेज आहे.  Realme फोनमध्ये ६४ मेगापिक्सेल प्रायमरी, ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज यामध्ये वापरकर्त्यांना मिळते. तुमच्या बजेटमधला असणारा हा एक सर्वोत्तम स्मार्टफोन आहे. ६/१२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटचा फोन फ्लिपकार्टवर १९,९९९ रुपयांना उपलब्ध असणार आहे.

Realme GT Neo 3T (Image Credit-Indian Express)

हा Realme फोन Android 12 आधारित Realme UI 3.0 सह येतो. फोन ड्युअल सिमला सपोर्ट करतो. इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर Realme GT Neo 3T मध्ये उपलब्ध आहे. याशिवाय यूएसबी टाइप-सी ऑडिओ, स्टिरिओ स्पीकर, डॉल्बी अॅटमॉस, हाय-रिझोल्यूशन ऑडिओ यासारखे फीचर्स आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 5G, Dual 4G VoLTE, Wi-Fi 6 802.11 AX, ब्लूटूथ 5.2, GPS, GLONASS, NFC आणि USB Type-C सारखी फीचर्स दिले आहेत. 

Google Pixel 6a

The Pixel 6a हा स्मार्टफोन एक मिडरेंज स्मार्टफोन आहे. google च्या या फोनमध्ये टेन्सर G 2 चिपसेट येतो. यामध्ये चांगल्या क्वालिटीचा कॅमेरा देखील देण्यात आला आहे. फोटोग्राफीसाठी ड्युअल रिअर कॅमेरा दिला असून, यात एफ/१.७ अपर्चर आणि OIS सह १२.२ मेगापिक्सल प्रायमरी सेंसर आणि १२ मेगापिक्सल अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी १८ वॉट वायर्ड चार्जिंगसह ४४०० एमएएच बॅटरी दिली असून, कंपनीचा दावा आहे की, ही २४ तासांचा बॅकअप देते. गुगलचा हा स्मार्टफोन तुम्हाला फ्लिपकार्टवर २५,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे.

(Image Credit-Indian Express)

हेही वाचा : VIDEO: भारतात ९ मे ला लॉन्च होणार POCO कंपनीचा ‘हा’ तगडा स्मार्टफोन; OLED डिस्प्लेसह मिळणार…

Poco X5 Pro

Poco कंपनीने नुकताच आपला Poco X Pro हा स्मार्टफोन लॉन्च केला आहे. यामध्ये ६४ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा वापरायला मिळतो. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित असणाऱ्या MIUI १४ वर चालतो. Poco X5 Pro हा स्मार्टफोन तुम्हाला २०,९९९ रुपयांना उपलब्ध असणार आहे.

Story img Loader