Flipkart एक ई-कॉमर्स वेबसाईट आहे. यावरून आपण आपल्याला आवश्यक असणाऱ्या वस्तू ऑनलाईन ऑर्डर करू शकतो. सध्या फ्लिपकार्टचा बिग सेव्हिंग्स डेज सेल सुरू आहे. यामध्ये अनेक वस्तूंवर ऑफर देखील आहेत. iPhone 15 सिरीज लॉन्च होण्याच्या काही महिने अगोदर फ्लिपकार्ट आयफोन १३ आणि आयफोन १४ सिरीजवर बिग सेव्हिंग्स डेज सेलचा भाग म्हणून मोठा डिस्काउंट देत आहे. फ्लिपकार्ट काही जुन्या आयफोन्सवर ११,४१० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. प्लॅटफॉर्म विशिष्ट सवलत देत आहे आणि उर्वरित ऑफर निवडक बँक कार्डांवर आधारित असणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयफोन १३ कोणत्याही अटींशिवाय ५८,४९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लिस्टेड आहे. Axix बँकेच्या क्रेडिट कार्डवर अतिरिक्त १० टक्के डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे फोनची किंमत ५७,४९९ रुपये होते. ही किंमत १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटसाठी आहे. Apple च्या आयफोन १३ ची अधिकृत किंमत अजूनही ५६,९९९ रुपये आहे. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

हेही वाचा : Phone Pe चा मोठा निर्णय! यापुढे पेमेंट होताच ऐकू येणार मराठी आवाज

आयफोन १४ ची मूळ किंमत ७९,९०० रुपयांपेक्षा कमी होऊन ती ६८,९९९ रुपये इतकी आहे. फ्लिपकार्ट बिग सेव्हिंग डेज सेल दरम्यान आयफोन १४ प्लस ७३,९९९ रुपयांना विकला जात आहे. ही किंमत १२८ जीबी स्टोरेज असणाऱ्या व्हेरिएंटसाठी आहे. आयफोन १४ प्रो मॅक्सची किंमत १,२७,९९९ रुपये आहे. तर प्रो मॉडेलची किंमत १,१६,९९९ रुपयांना आहे.

मात्र नवीन व्हर्जनपेक्षा आयफोन १३ खरेदी करणे चांगले ठरू शकते. कारण दोघांमध्ये सारखीच फीचर्स आहेत. कॅमेरा आउटपुटच्या बाबतीत फारसा फरक नाही. कॅमेरे Samsung Galaxy S23 सिरीजपेक्षा चांगले नाहीत मात्र आयफोनमध्ये सेन्सरचा एक चांगला सेट आहे. जो दिवसाच्या प्रकाशात काही नयनरम्य शॉट देऊ शकतो. जेव्हा सॉफ्टवेरबद्दल बोलले जाते तेव्हा Apple सहा वर्षांच्या जुन्या फोनला देखील अपडेट देण्यासाठी ओळखला जाते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flipkart big savings days sale big discount iphone 13 and 14 series ahead launch of iphone 15 tmb 01
Show comments