Flipkart Is Charging 20 Rupees Cancellation Fee : सध्या छोट्या छोट्या वस्तू ऑनलाइन मागवण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. अगदी घरातले मीठ आणण्यापासून ते लग्न समारंभासाठी एखादा ड्रेस खरेदी कारण्यापर्यंत आपण बऱ्याच गोष्टी ऑनलाइन मागवतो. आवडल्या नाही की परतसुद्धा करतो. जर तुम्हीही असंच करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे, कारण आता फ्लिपकार्टने ऑनलाइन ऑर्डर रद्द केल्यास कॅन्सलेशन फी (Flipkart Cancellation Fee) भरावी लागणार असल्याचे जाहीर केले आहे. तर काय खरं काय खोटं बातमीतून सविस्तर जाणून घेऊया…
टीपस्टार अभिषेक यादवने एक्स (ट्विटर) वर एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे, ज्यामध्ये फ्लिपकार्ट प्लॅटफॉर्म ऑर्डर रद्द केल्यास २० रुपये शुल्क आकारत (Flipkart Cancellation Fee ) असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे अलीकडेच फ्लिपकार्ट चर्चेत आला आहे. ई-कॉमर्सची दिग्गज कंपनी ऑर्डर रद्द करण्यासाठी शुल्क आकारत आहे हे वाचून अनेक ग्राहक आश्चर्यचकित झाले आहेत आणि सोशल मीडियावर याबद्दल चर्चा रंगली आहे.
पॉलिसी दोन वर्षांपासून लागू आहे (Flipkart Cancellation Fee)
तर यासंबंधी प्रतिसाद देत फ्लिपकार्टने इंडिया टुडेला माहिती दिली की, ऑर्डर कॅन्सलेशन चार्ज हा आता नव्याने केलेला बदल नाही, तर ही पॉलिसी दोन वर्षांपासून लागू आहे आणि ऑर्डर केल्यानंतर २४ तासांनंतर रद्द केल्यासच लागू होते. पहिल्या २४ तासांत रद्द केलेल्या ऑर्डरसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही, ज्यामुळे ग्राहकांना त्यांचे विचार बदलण्याची एक फ्री विंडो मिळते.
हेही वाचा…Quantum Chip :सुपर कॉम्प्युटरलाही हजारो वर्षे लागतील; पण गूगलची ‘ही’ नवी चिप ५ मिनिटांत उत्तर देईल
फ्लिपकार्टच्या अधिकृत पॉलिसीनुसार, विक्रेते आणि लॉजिस्टिक पार्टनर्स, शिपमेंटसाठी ऑर्डरची प्रक्रिया करण्यासाठी केलेल्या खर्चाची पूर्तता करण्यासाठी रद्दीकरण शुल्क लागू केले जाते. कंपनीने स्पष्ट केले की, ऑर्डर प्रोसिड होण्याआधीच रद्द केल्यावरच कॅन्सलेशन चार्ज भरावे लागते. फ्लिपकार्टचे म्हणणे आहे की, ऑर्डर रद्द केल्यामुळे होणारा खर्च वास्तविक खर्चाच्या समान किंवा त्यापेक्षा निश्चित कमी आहे.
विक्रेते आणि लॉजिस्टिक पार्टनर्सद्वारे केलेले प्रयत्न, वेळ आणि संसाधनांची भरपाई कॅन्सलेशन ऑर्डरच्या शुल्कातून दिली जाते. रद्द केलेल्या ऑर्डरसाठी ग्राहकाने दिलेल्या रकमेतून (कॅन्सलेशन चार्ज) शुल्क वजा केले जातात. तसेच फ्लिपकार्टकडे परिस्थितीनुसार यामध्ये बदल करण्याची किंवा फी माफ करण्याची लवचिकतासुद्धा आहे.
तसेच टीपस्टार अभिषेक यादवने शेअर केलेल्या एक्स (ट्विटर) पोस्टवरच्या ग्राहकांच्या कमेंट पाहता असे दिसते की, आतापर्यंत अनेक ग्राहकांना याबद्दल माहीत नव्हते (Flipkart Cancellation Fee), पण ही गोष्ट प्रत्येकाने लक्षात ठेवली पाहिजे की, फ्लिपकार्टची ही पॉलिसी नवीन नाही. तसेच ऑर्डर उशिरा रद्द केल्यामुळे होणारे ऑपरेशनल नुकसान संतुलित करण्याच्या उद्देशाने हे रद्दीकरण शुल्क नेहमी ग्राहकांकडून घेतले जाणार आहे.