उद्या सर्व देशभरामध्ये विजयादशमी म्हणजेच दसरा हा सॅन साजरा केला जाणार आहे. दसऱ्यानिमित्त लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट असणाऱ्या फ्लिपकार्टने दसरा स्पेशल सेलची घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीचा बिग बिलियन डेज सेल संपला आहे. आयफोन १४ फ्लिपकार्टच्या बिग बिलियन डेज सेलमध्ये सर्वात कमी किंमतीमध्ये ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता. या सेलमध्ये सर्वात जास्त विक्री होणार फोन देखील आयफोन १४ च होता. आयफोन १४ मागील वर्षी लॉन्च करण्यात आला होता. आता आयफोन १५ सिरीज लॉन्च केल्यानंतर कंपनीने आयफोन १४ सिरीजमधील फोनच्या किंमतीमध्ये घट केली आहे. आता दसऱ्याच्या सेलमध्ये खरेदीदारांना आयफोन १४ हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. फ्लिपकार्टच्या दसऱ्याच्या सेलमध्ये आयफोन १४ स्वस्तात कसा खरेदी करता येणार आहे, त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा