Blaupunkt TV Offers in Flipkart Electronics Sale: फ्लिपकार्टवर इलेक्ट्रॉनिक्स सेल सुरू झाला आहे. २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये टीव्ही आणि इतर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांवर ७५ टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. तुम्ही फ्लिपकार्टवर स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक परवडणारी संधी आहे. Blaupunkt Smart TV अनेक उत्तम डील्ससह उपलब्ध आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला Blaupunkt TV वर मोठी बचत करण्यास सुरुवात करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. Flipkart वर, ग्राहकांना ICICI बँक आणि PNB डेबिट आणि क्रेडिट कार्डवर १० टक्के सूट मिळू शकते. Blaupunkt च्या Sigma 24-इंचाचा टीव्ही आणि इतर मॉडेल्सवर या काळात मोठी सूट दिली जात आहे.
Flipkart’s Electronic Sale Smart TV Discount Offer
Blaupunkt Sigma 3in1 24inch Smart TV Flipkart Electronics Sale मध्ये ६,७४९ च्या किमतीत उपलब्ध आहे. Blaupunkt स्मार्ट टीव्हीमध्ये २४-इंचाचा HD रेडी डिस्प्ले आहे जो ३०० nits पर्यंत ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या टीव्हीमध्ये २० W साउंड आउटपुट आहे, ज्यासाठी दोन बिल्ट-इन स्पीकर प्रदान केले आहेत. हा टीव्ही A35*4 चिपसेट आणि २.४ GHz Wi-Fi सह येतो.
(हे ही वाचा : ChatGpt: आता Alexa प्रमाणेच ChatGPT ही तुम्हाला ऐकवणार गाणं? देणार तुमच्या प्रश्नाची उत्तरं )
Blaupunkt चा सर्वात मोठा ७५-इंचाचा स्मार्ट टीव्ही या कालावधीत ८८,९९९ मध्ये उपलब्ध आहे. Blaupunkt च्या या QLED मालिकेतील टीव्हीमध्ये Google TV समर्थित आहे. Blaupunkt चा ५०-इंचाचा टीव्ही ३५,९९९ रुपयांना विक्रीत उपलब्ध आहे, ५५-इंच टीव्हीची किंमत ३९,९९९ रुपये आहे आणि ६५-इंचाचा टीव्ही ६३,९९९ रुपयांना विकत घेता येईल. Blaupunkt Google TV 360 डिग्री सराउंड साउंड आणि डॉल्बी अॅटमॉस तंत्रज्ञानासह ६०W स्पीकर्स मिळते. याशिवाय गुगल असिस्टंटसोबत व्हॉईस कंट्रोल सपोर्ट उपलब्ध आहे, ज्यामध्ये व्हॉईस कमांडद्वारे टीव्ही नियंत्रित केला जाऊ शकतो.
Blaupunkt 4K स्मार्ट टीव्ही ३२-इंच (32CSA7101) Cybersound LED Smart TV ९,९९९ मध्ये, तर ४०-inch (40CSA7809) Cybersound LED स्मार्ट TV १५,९९९ मध्ये सूचीबद्ध आहे. ४२ इंच (42CSA7707) Cybersound LED स्मार्ट टीव्ही १६,९९९ मध्ये उपलब्ध आहे. ४३ इंच (43CSA7121), Cybersound 4K LED स्मार्ट टीव्ही २४,९९९ मध्ये सेलमध्ये उपलब्ध आहे. Blaupunkt Cybersound 50 इंच अल्ट्रा HD (4K) LED स्मार्ट टीव्ही (50CSA7007) २६,४९९ मध्ये सेलमध्ये उपलब्ध आहे.