१२ सप्टेंबर रोजी कॅलिफोर्निया येथे Apple कंपनीने आपली आयफोन १५ सिरीज लॉन्च केली आहे. १८ सप्टेंबरपासून त्याचे प्री-बुकिंग सुरु झाले आहे. २२ तारखेपासून त्याची विक्री सूर होणार आहे. आयफोन १५ सिरीजमध्ये आयफोन १५ , आयफोन १५प्लस , आयफोन १५ प्रो आणि आयफोन १५ प्रो मॅक्स या चार मॉडेल्सचा समावेश आहे. आयफोन १५ सिरीज लॉन्च झाल्यानंतर कंपनी आयफोन १४ च्या किंमतीमध्ये घट झाली आहे. सध्या आयफोन १४ हा कंपनीच्या स्टोअरवर ६९,९०० रुपयांमध्ये उपलब्ध आहे. तथापि हा फ्लिपकार्टवर खूपच स्वस्तात उपलब्ध आहे. आयफोन १४ फ्लिपकार्टवर स्वस्तात कसा उपलब्ध आहे आणि तुम्ही तो किती रुपयांमध्ये खरेदी करू शकता हे जाणून घेऊयात.
आयफोन १३ प्रमाणेच समानता असल्यामुळे आयफोन १४ मॉडल लॉन्च झाल्यानंतर लगेचच छाप पाडण्यात अयशस्वी झाले. आयफोन १४ मध्ये आयफोन १३ प्रमाणेच चिपसेटचा सपोर्ट देण्यात आला आहे. यामध्ये आयफोन १३ प्रमाणेच नॉचसह ६.१ इंचाचा सुपर रेटिना XDR डिस्प्ले मिळतो. ज्यात सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी १२ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. तसेच रिअर कॅमेरा हा १२ मेगापिक्सलचा सेन्सरआणि ड्युअल कॅमेरा सेटअपसह येतो. याबाबतचे वृत्त dnaindia ने दिले आहे.
हेही वाचा : खुशखबर! आता WhatsApp वरून करता येणार UPI पेमेंट, जाणून घ्या
Apple ने भारतात नवीन आयफोन १५ हा ७९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च केला आहे. आयफोन १५ थोडेसे वेगळे डिझाइन, आणि चांगला कॅमेरा, फास्ट प्रोसेसर आणि यूएसबी पोर्ट-सी सह येतो. मात्र कंपनी आयफोन १५ सिरीजमधील प्रो मॉडेलमध्ये अनेक बदल केले आहेत. आयफोन १५ प्रो मध्ये ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे. यामध्ये तुम्हाला कमी प्रकाशातील फोटो काढण्याचे फिचर मिळणार आहे. तसेच यात तुम्हाला 3X टेलीफोटो लेन्स आणि 5X ऑप्टिकल झूम फिचर मिळणार आहे. १२मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेन्ससह वापरकर्त्यांना मॅक्रोकामेरा देखील मिळणार आहे.
आयफोन १४ ला मागच्या वर्षी आयफोन १४ प्रो आणि आयफोन १४ प्लससह ७९,९०० रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीसह लॉन्च करण्यात आले होते. आयफोन १४ च्या २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटची किंमत अनुक्रमे ७९,९०० आणि ९९,९०० रुपये आहे. आयफोन १४ सध्या अधिकृत स्टोअरवर ४,९०१ रुपयांच्या डिस्काउंटसह ६४,४९९ रुपयांना उपलब्ध आहे. याशिवाय फ्लिपकार्ट तुमच्या जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात ३०.,६०० रुपयांचा डिस्काउंट देत आहे. याचा अर्थ म्हणजे सर्व बँक ऑफर्स आणि डिस्काउंट धरून आयफोन १४ फ्लिपकार्टवर केवळ ३४,३३९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. यावर तुम्हाला तब्बल ३५,५०१ रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.