Flipkart या ई-कॉमर्स वेबसाइटवर सध्या Mobile Bonanza Sale सुरु आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला म्हणजेच १ जून रोजी या सेलची सुरुवात झाली. तर ७ जून हा सेलचा शेवटचा दिवस आहे. या सेलमार्फत ग्राहकांना विविध स्मार्टफोन्सवर आकर्षक ऑफर्स दिल्या जात आहेत. आयसीआयसीआय बॅंकेच्या कार्डवर फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये १० टक्क्यांची सूट मिळत आहे. तर एचडीएफसी बॅंकेच्या कार्डावरही असंख्य ऑफर्स असल्याची माहिती समोर आली आहे. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये नो-कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्सचा देखील समावेश करण्यात आला आहे.
आजतकने दिलेल्या माहितीनुसार, या सेलच्या टॉप ऑफर्समध्ये अनेक महागड्या स्मार्टफोन्सवर ऑफर्स असल्याचे पाहायला मिळते. याच्या मदतीने POCO X5 5G हा महागडा फोन स्वस्तात मिळणार आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर आणि 120Hz ची AMOLED स्क्रीन आहे. फोनची किंमत २०,००० रुपये आहे. सेलच्या ऑफर्समुळे तुम्ही १४,९९९ रुपये देऊन खरेदी करु शकता. फ्लिपकार्टच्या सेलमध्ये iPhone14 देखील समाविष्ट करण्यात आला आहे. फ्लिपकार्ट सेलमुळे EMI पद्धतीने हा लेटेस्ट आयफोन कोणालाही खरेदी करणे होणार आहे. यासाठी ग्राहकाला दर महिन्याला २,८३४ रुपये भरावे लागतील. सेलमध्ये आयफोनची किंमत ७०,९९९ रुपये असल्याची माहिती देण्यात आली आहे.
फ्लिपकार्ट मोबाइल बोनान्झा सेलमधील टॉप ऑफर्स –
- POCO X5 5G : किंमत १४,९९९ रुपये
- iPhone14 : मासिक EMI – २८३४ रुपये (किंमत – ७०,९९९)
- Vivo T2x 5G – किंमत १२,९९९ रुपये
- Google Pixel 6a – किंमत २७,९९९ रुपये (EMI ऑफ्शन उपलब्ध)
- Realme 10 Pro Mobile Series – किंमत १७,९९९ रुपये (७,००० रुपयांची Additional exchange offer)
यांसारख्या अनेक ऑफर्स तुम्हाला फ्लिपकार्टवर पाहायला मिळतील. जर तुम्ही स्मार्टफोन घ्यायचा विचार करत असाल, तर हा मोबाईल बोनान्जा सेल तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरु शकतो. फ्लिपकार्टचा सेल बुधवारी ७ जून रोजी संपणार आहे.