फ्लिपकार्ट ही भारतातील लोकप्रिय ई-कॉमर्स वेबसाइट आहे. या वेबसाइटवर नवीन वर्षाच्या पहिल्या ‘बिग बचत धमाल सेल २०२४’ला सुरुवात झाली असून आज या सेलचा शेवटचा दिवस आहे. फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये अनेक गोष्टींवर चांगल्या ऑफर्स मिळत आहेत. त्यात स्मार्टफोन्सवरदेखील भरघोस सवलत मिळत आहे. जर तुम्ही जास्त पैसे खर्च न करता, २०२३ मध्ये लाँच करण्यात आलेले स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर या सेलमधून फोन विकत घेणे तुमच्यासाठी फायद्याचे ठरेल.

फ्लिपकार्टच्या बिग बचत धमाल सेल २०२४ मध्ये कोणत्या स्मार्टफोनवर डिस्काउंट मिळत आहे?

Vodafone Idea reduces data benefits in 23 rupees prepaid plan
Vodafone Idea Prepaid Plan: वोडाफोन आयडियाच्या २३ रुपयांच्या प्लॅनमध्ये झाला बदल; आता मिळेल ‘इतका’ डेटा; घ्या जाणून
BSNL TV Service With Over 500 Live Channels in India
BSNL IFTV : बीएसएनएलची टीव्ही सेवा सुरू, पाहता…
Apple new Share Item Location feature
Share Bag Location: प्रवासादरम्यान लगेज हरवलं? आता चिंता सोडा, तुम्हाला मदत करणार शेअर बॅग लोकेशन
High Severity Alert For Apple Users
High Severity Alert For Apple Users : ॲपल युजर्सना मोठा धोका? लीक होऊ शकतात पर्सनल डिटेल्स; तुमचा फोन ‘या’ यादीत आहे का तपासा
4 Ways to Find Your WiFi Password when You Forgot It
How To Find Wi-Fi Password: वाय-फायचा पासवर्ड विसरलात का? मग ‘या’ सोप्या टिप्स वापरा आणि मिळवा सेव्ह केलेला पासवर्ड
Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
Battery Saving Tips For Laptop
Battery Saving Tips For Laptop : काम करताना लॅपटॉप सारखा चार्ज करावा लागतो का? मग या सेटिंग्जमध्ये आजच करा बदल
ChatGPT now has its own web search engine
OpenAI’s Search Engine : OpenAI चे नवे सर्च इंजिन! अचूक माहिती शोधणे होणार सोपे; विनामूल्य करता येईल वापर
What is Netflix Moments
What is Netflix Moments : आता नेटफ्लिक्सवर मालिका, चित्रपटातील आवडता सीन शेअर करण्याची सोय; वाचा कसं वापरायचं हे फीचर

ॲपल आयफोन १५ (Apple iPhone 15) :

ॲपलचा आयफोन १५ आता फक्त ६९,९९९ रुपयांमध्ये सेलदरम्यान उपलब्ध आहे; जो काही महिन्यांपूर्वी ७९,९०० रुपयांमध्ये लाँच झाला होता. या फोनमध्ये ४८ एमपी प्रायमरी कॅमेरा आणि यूएसबी-सी पोर्ट (USB-C पोर्ट) आणि पाच सुंदर रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तसेच हा आयफोन इतर मॉडेलप्रमाणे पाणी व धूळ यांपासून संरक्षण करण्यासाठी आयपी ६८ रेट करण्यात आला आहे. तसेच हा मॅगसेफ चार्जलादेखील सपोर्ट करतो.

गुगल पिक्सेल ८ (Google Pixel 8) :

गुगलचा नवीन स्मार्टफोन फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये ५९,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. कॅमेरा आणि एआय क्षमतेसाठी हा स्मार्टफोन ओळखला जातो. गुगल पिक्सेल हे उपकरण टेन्सर जी३ (Tensor G3) प्रोसेसरद्वारे समर्थित आहे आणि ८जीबी रॅम व १२८ जीबी अंतर्गत स्टोरेज प्रदान करते.

सॅमसंग गॅलेक्सी एस२३ (Samsung Galaxy S23) :

स्नॅपड्रॅगन ८ जेन ३ एसओसीद्वारे समर्थित सॅमसंग गॅलॅक्सी एस२३ आता फ्लिपकार्टवर ५४,९९९ रुपयांना उपलब्ध आहे. सॅमसंगच्या या कॉम्पॅक्ट फ्लॅगशिपमध्ये आधुनिक ॲण्ड्रॉइड फ्लॅगशिपकडून अपेक्षित असलेल्या सर्व गोष्टी आहेत.

ओपो फाईंड एन३ फ्लिप (Oppo Find N3 Flip) :

ओपोचा नवीन फ्लिप फोन आता तुम्ही फ्लिपकार्टवर ८६,४९९ रुपये या सवलतीच्या दरात खरेदी करू शकता. MediaTek Dimensity ९२०० एसओसीला सपोर्ट करणारा हा स्मार्टफोन १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी अंतर्गत स्टोरेजसह ऑफर करतो. मार्केटमधील ट्रिपल कॅमेरा असलेल्या काही फ्लिप फोन्सपैकी हा एक आहे; ज्यामध्ये टेलीफोटो लेन्सचा समावेश आहे.

हेही वाचा…VI फाउंडेशनचे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबीर ! समजून घ्या काय असणार खास…

मोटोरोला एड्ज ४० एनइओ (Motorola Edge 40 neo) :

मोटोरोला144Hz FHD+ रिझोल्युशन वक्र डिस्प्ले आणि IP68 रेटिंगसह फ्लिपकार्टवर २१,९९९ रुपयांना उपलब्ध आहे; ज्यामुळे तो स्मार्टफोन IP68 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स रेट करण्यात आलेला आहे. डिव्हाइस प्रीमियम लेदर बॅक पॅनेलदेखील ऑफर करते. तसेच डिव्हाइस Mediatek Dimensity 7030 SoC द्वारे समर्थित आहे.

ॲपल आयफोन १४ (Apple iPhone 14) :

ॲपल आयफोन १४ या सेलमध्ये तुम्हाला ५९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. डिव्हाइसमध्ये आयफोन १५ प्रमाणेच प्रीमियम ग्लास सँडविच डिझाइन (premium glass sandwich design) आणि ए१६ बायोनिक प्रोसेसर आहे. आयफोन १४ मध्ये १२ एमपी वाइड अँगल आणि अल्ट्रा वाइड अँगल लेन्ससह ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तसेच आयफोन १५ हा आयओएस १७ ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो.

सॅमसंग गॅलॅक्सी एफ १३ (Samsung Galaxy F13) :

या स्मार्टफोनमध्ये एफ १३ ( F13 ) हा ६,००० एमएएच बॅटरी, ५० एमपी प्रायमरी कॅमेरा व हाय रिझोल्युशन ६.६ इंच एफएचडी प्लस रिझोल्युशन स्क्रीन आदी काही वैशिष्ट्यांसह सॅमसंगचा एक उत्तम बजेट स्मार्टफोन आहे; जो या सेलमध्ये ९,९९९ रुपयांना मिळत आहे.

रिअलमी सी५३ (Realme C53) :

108 MP कॅमेऱ्यासह बाजारातील सगळ्यात स्वस्त स्मार्टफोन सध्या फ्लिपकार्टवर ८,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. रिअलमी सी५३ हा सर्वांत चांगला एंट्री लेव्हल स्मार्टफोन आहे; ज्याच्या मागील बाजूस आयफोनसारखा कॅमेरा आहे. या स्मार्टफोनमध्ये डायनॅमिक Island म्हणजे मिनी कॅप्सूल आहे. तसेच चॅम्पियन ब्लॅक आणि चॅम्पियन गोल्ड या दोन रंग पर्यायांमध्ये तो उपलब्ध आहे.

पोको एम६ प्रो ५जी (Poco M6 Pro 5G) :

सेलमध्ये हा ५जी स्मार्टफोन तुम्हाला १०,९९० रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ४ जेन २ एसओसी आहे. तसेच ६.७९ इंच एफएचडी प्लस रिझोल्युशन स्क्रीन, ५००० एमएएच बॅटरी व १२८ जीबी अंतर्गत स्टोरेज आहे. हे स्मार्टफोन्स तुम्हाला या सेलमध्ये बजेटमध्ये घेण्याची संधी मिळणार आहे.