नुकतेच काही दिवसांपूर्वी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट या ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर रिपब्लिक डे सेल सुरू होता. त्यादरम्यान अनेकांनी, अनेक वस्तू अत्यंत किफायतशीर आणि सवलीच्या दरात खरेदी केल्या आहेत. या सेलमध्ये विविध इलेक्ट्रॉनिक्स, गृहोपयोगी वस्तू आणि स्मार्टफोनवरसुद्धा मोठ्या ऑफर्स सुरू होत्या. त्यामध्ये सॅमसंग, वनप्लस, ॲपल इत्यादी अनेक मोठमोठ्या ब्रॅण्ड्सचा समावेश होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

फ्लिपकार्टच्या रिपब्लिक डे सेलदरम्यान एका व्यक्तीने, iPhone १५ मागवला होता. मात्र, त्या व्यक्तीने जेव्हा तो फोन चालू करून पहिला तेव्हा त्याला चांगलाच धक्का बसला. आयफोनमधील बॅटरीसोबत काहीतरी घोटाळा झाला असल्याचे त्याने एक्स या सोशल मीडियावरून शेअर केले आहे. नेमके प्रकरण काय आहे ते पाहूया.

हेही वाचा : लवकरच भारतात लाँच होणार OnePlus 12 सीरिज; काय आहेत याचे फीचर्स, किंमत अन स्पेसिफिकेशन्स, जाणून घ्या…

“मी १३ जानेवारीला फ्लिपकार्टवरून आयफोन मागवला होता, त्याचे पार्सल मला १५ जानेवारीला मिळाले; मात्र फ्लिपकार्टने माझ्यासोबत चांगलाच घोटाळा केला आहे. माझी फसवणूक केली आहे. मला मिळालेल्या आयफोन १५ मध्ये बिघाड आहे. इतकेच नाही तर त्याचे पॅकिंगदेखील खोटे आहे. असे असले तरीही तक्रार केल्यानंतर आता कंपनी मला उत्पादन बदलून देत नाहीयेत”, असे अजय राजवत [@1234ajaysmart] नावाच्या व्यक्तीने त्याच्या एक्स [पूर्वीचे ट्विटर] अकाउंटवरून शेअर केले आहे. त्याबरोबरच त्याला मिळालेल्या आयफोन १५ स्मार्टफोनचे फोटो आणि व्हिडीओदेखील जोडलेले आहेत आणि फ्लिपकार्ट सपोर्टच्या अकाउंटला टॅग केले आहे.

शेअर केलेल्या फोटोंपैकी एका फोटोमध्ये फोनवरील स्क्रीनवर बॅटरी संबंधित लिहिलेला मेसेज पाहता येतो. त्यानुसार, आयफोनमध्ये बसवण्यात आलेली बॅटर खोटी असल्याचे समजते. तर दुसऱ्या फोटोमध्ये आयफोन चार्जिंगला लावल्यानंतर आलेला मेसेज पाहायला मिळतो. त्यानुसार, आयफोनमधील बॅटरी व्हेरिफाय करता येत नाही. तसेच बॅटरी हेल्थबद्दल माहिती देण्यास फोन असक्षम असल्याचे समजते.

@1234ajaysmart या अकाउंटने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओला आत्तापर्यंत २८.७K इतके व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flipkart republic day sale scam man ordered iphone 15 but received with fake battery x post went viral dha