Flipkart cash on delivery fee : ऑनलाईन ईकॉमर्स कंपन्यांकडून वस्तू खरेदीवर ग्राहकांना मोठी सूट दिली जाते. त्यामुळे, ग्राहक या प्लॅटफॉर्म्सवरून मोट्या प्रामाणात, डिजिटल उपकरणे, कपडे आणि इतर वस्तू खरेदी करतात. तसेच कंपन्यांकडून कॅश ऑन डिलिव्हरीची देखिल सुविधा मिळते. त्यामुळे, डिलिव्हरी झाल्यावर वस्तूचे पैसे देता येते. ज्यांना लगेच पैसे देऊन वस्तू घेणे शक्य नाही, त्यांना कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय सोयिस्कर ठरतो. पैशांची तजवीज करायला वेळही मिळते. मात्र, फ्लिपकार्टने कॅश ऑन डिलिव्हरीबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. फ्लिपकार्ट कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडणाऱ्या ग्राहकांकडून आता हँडलिंग फी आकारणार आहे.
फ्लिपकार्ट हँडलिंग फी म्हणून आता ग्राहकांकडून ५ रुपये आकारणार आहे. हा अतिरिक्त शुल्क देण्यासाठी युजर तयार असतील तर ते कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडू शकतात. फ्लिपकार्ट मोबाईल अॅप आणि संकेतस्थळानुसार, जर युजरला ऑनलाईन पेमेंट करायचे नसेल तर त्यांना एक छोटे अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल.
(ट्विटरवरील आवडता व्हिडिओ स्मार्टफोनवर डाऊनलोड करण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स)
सध्या कॅश ऑन डिलिव्हरी निवडणाऱ्या फ्लिपकार्टच्या युजरला केवळ डिलिव्हरी चार्ज द्यावा लागतो. फ्लिपकार्टवर ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीची वस्तू ऑर्डर केल्यास ४० रुपये डिलिव्हरी फी द्यावी लागते. ५०० पेक्षा अधिक किंमतीच्या वस्तूंवर डिलिव्हरी फी द्यावी लागत नाही. तर फ्लिपकार्ट प्लस सदस्यांना डिलिव्हरी चार्ज द्यावा लागत नाही. मात्र, आता सर्व युजर्सना कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडल्यास अतिरिक्त शुल्क द्यावा लागेल.