Flipkart Best Deals Smart Tv : तुम्ही स्मार्टी टीव्ही घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे. फ्लिपकार्टवर Year end sale सुरू आहे. या सेलमध्ये तुम्ही बचतीसह स्मार्ट टीव्ही घेऊ शकता. हा सेल ३१ डिसेंबरपर्यंत असणार आहे. सेलमध्ये स्मार्टफोन, स्मार्टवॉच, टीडब्ल्यूएस इअरबड्स आणि इतर अनेक उपकरणांवर सूट मिळत आहे. टीव्हीवरही चांगली सूट मिळत आहे. सेलमध्ये २५ हजारांखालील टीव्हीवर बेस्ट डिल्स मिळत आहेत. कोणत्या आहेत या टीव्ही? जाणून घेऊया.
१) रिअल मी फूल एचडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही
फ्लिपकार्टवर realme (40 inch) Full HD Smart Android TV ची लिस्टेड किंमत ३१ हजार ९९९ रुपये आहे. मात्र, त्यावर ३७ टक्के सूट देण्यात आल्याने तुम्ही हा टीव्ही १९ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी शरू शकता. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला १० टक्के सूट मिळू शकते. टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम मिळते. टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिजनी प्लस हॉटस्टार सपोर्ट करतो.
(इन्स्टाग्रामवरील आवडते Video, Reels करू शकता डाऊनलोड, फॉलो करा ‘या’ स्टेप्स)
२) वनप्लस वाय १ स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही
फ्लिपकार्टवर OnePlus Y1 (40 inch) LED Smart Android TV ची किंमत २७ हजार ९९९ रुपये आहे. मात्र, या टीव्हीवर २१ टक्के सूट देण्यात आल्याने तुम्ही तो २१ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड ईएमआय ट्रान्झॅक्शनवर तुम्हाला १० टक्के सूट मिळू शकते. या स्मार्ट टीव्हीमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम मिळते. टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिजनी प्लस हॉटस्टार सपोर्ट करतो.
३) एमआय फूल एचडी एलईडी स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही
फ्लिपकार्टवर Mi 5A (40 inch) Full HD LED Smart Android TV ची लिस्टेड किंमत २९ हजार ९९९ रुपये आहे. मात्र या स्मार्ट टीव्हीवर २६ टक्के सूट मिळत असल्याने टीव्हीची किंमत २१ हजार ९९९ रुपये झाली आहे. टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम मिळते. टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिजनी प्लस हॉटस्टार सपोर्ट करतो.
(थकित वीज बिल लवकर भरा अन्यथा.. सायबर भामट्यांनी व्यक्तीला ४.९ लाखांनी लुटले, ‘असे’ अडकवले जाळ्यात)
४) वनप्लस वाय १ एस स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही
फ्लिपकार्टवर OnePlus Y1S (43 inch) Full HD LED Smart Android TV ची लिस्टेड किंमत ३१ हजार ९९९ रुपये असून त्यावर २१ टक्के सूट देण्यात आली आहे. त्यामुळे आता हा टीव्ही तुम्ही २४ हजार ९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. या टीव्हीवर १६ हजार रुपयांपर्यंतचा एक्सचेंज ऑफर मिळत आहे. या स्मार्ट टीव्हीमध्ये अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिम मिळते. टीव्ही नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, डिजनी प्लस हॉटस्टार सपोर्ट करतो.