Instagram Chatting safety news: इंटरनेटच्या युगात डिजिटल प्रायव्हसी ही एक मोठी समस्या बनली आहे. यावर मात करण्यासाठी कंपनीकडून अनेक पावलं उचलली जात आहेत. सोशल मीडियावर फोटो शेअरिंगसाठी जगप्रसिद्ध बनलेला इन्स्टाग्राम प्लॅटफॉर्म सर्वात लोकप्रीय अॅप्समध्ये एक आहे. इन्स्टाग्रामवर युजरला अनेक जबरदस्त फिचर्स मिळत असतात. तसंच युजर्सच्या सिक्योरिटीबाबतही कंपनी काळजी घेत असते. फेसबुक आणि व्हाट्सअॅपवर चॅटिंगमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुरु करण्याचा विकप्ल असतो, तसाच फिचर इन्स्टाग्रामवरही आहे.
इंटरनेटच्या या युगात डिजिटल प्रायव्हसी एक मोठा चिंतेचा विषय बनला आहे. अशा परिस्थितीत युजर्सला त्यांचे मेसेज सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर तुमचे मेसेज सुरक्षित ठेवले नाहीत, तर तुमचं सायबर चोरटे हॅक करु शकतात. त्यामुळे इन्साग्रामवर दिलेल्या सुविधांचा उपयोग करणे महत्वाचं आहे. यासाठी आम्ही तुम्हाला इन्स्टाग्रामवर या फिचरचा वापर कसा करायचा याबाबत सांगणार आहोत.
नवीन चॅटिंगसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुरु कसं करायचं?
स्टेप १ – स्मार्ट डिवाईसवर Instagram अॅप ओपन करा.
स्टेप २ – यानंतर DM सेक्शनवर क्लिक करा.
स्टेप ३ – आता उजव्या कोपऱ्यात वर दिलेल्या प्लस आयकॉनवर टॅप करा.
स्टेप ४ – इथे स्टार्ट टू एंड एन्क्रिप्टेड चॅट विकप्लावर क्लिक करा.
स्टेप ५- आता ज्यांच्यासोबत तुम्हाला सुरक्षितरित्या बोलायचं आहे, ते अकाउंट निवडा.
नक्की वाचा – गुगल पे काम करत नाही? मग Whatsapp आहे ना, ‘असे’ पाठवा पैसे
आधीच्या चॅटमध्ये एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुरु कसं करायचं?
स्टेप १ – स्मार्ट डिवाईसवर Instagram अॅप ओपन करा.
स्टेप २ – त्या चॅटिंगमध्ये जा ज्यात तुम्हाला एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुरु करायचं आहे.
स्टेप ३- रिसीव्हरचं नाव शोधण्यसाठी चॅट विंडोच्या वरती टॅप करा.
स्टेप ४- खाली स्क्रोल करा आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्शन फिचरला प्रेस करा.
स्टेप ५ – इथे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुरक्षेसोबत एक नवीन चॅटिंग ओपन होईल.