स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी ट्रूकॉलर (Truecaller) एक सोयीस्कर ॲप बनले आहे. ट्रूकॉलर युजर्सना अज्ञात नंबर ओळखण्यास आणि स्पॅम कॉल ब्लॉक करण्यात मदत करते. अनोळखी कॉलची ओळख पटवून देणे हे ट्रूकॉलरचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. पण, काही वापरकर्त्यांना त्यांच्या प्रायव्हसीची चिंता असते. तर या युजर्सना आता चिंता करण्याची गरज नाही. तुम्हाला जर ट्रूकॉलरवरील तुमचे अकाउंट डिलीट करायचे असेल किंवा तुमचा नंबर तुम्हाला काढून टाकायचा असेल तर सोपी प्रोसेस फॉलो करावी लागेल. अँड्रॉइड आणि आयफोन वापरकर्ते कशाप्रकारे ट्रूकॉलर अॅपमधील स्वतःचे अकाउंट (नाव) डिलीट व नंबर काढून टाकू शकतात, याविषयी आपण या लेखातून जाणून घेऊया.
अँड्रॉइड फोनमधून ट्रूकॉलर अकाउंट कसे डिलीट करायचे ?
- अँड्रॉइड वापरकर्त्यांनी ट्रूकॉलर अकाउंट डिलीट करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा…
- तुमच्या फोनमधील ट्रूकॉलर ॲप ओपन करा.
- डावीकडे असणाऱ्या तीन डॉटवर टॅप करा.
- त्यानंतर सेटिंग्समध्ये जा.
- दिलेल्या पर्यायांमधून प्रायव्हसी सेंटर शोधा.
- त्यानंतर अकाउंट डिॲक्टिव्हेट या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या स्क्रीनवर दिसणारा संदेश वाचा आणि कन्फर्म बटणावर क्लिक करा.
आयफोनवरून ट्रूकॉलर अकाउंट कसे डिलीट करायचे?
- आयफोन वापरकर्त्यांसाठी त्यांचे ट्रूकॉलर अकाउंट डिलीट करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा…
- तुमच्या फोनमध्ये असणारा ट्रूकॉलर ॲप उघडा.
- नंतर उजव्या कोपऱ्यात असणाऱ्या गियर (Gear) चिन्हावर टॅप करा.
- अबाउट ट्रूकॉलर (About Truecaller) वर क्लिक करा.
- नंतर खाली स्क्रोल करा आणि अकाउंट डिॲक्टिव्हेट वर टॅप करा.
- तुमच्या स्क्रीनवर दिसणारा संदेश वाचा आणि कन्फर्म बटणावर क्लिक करा.
तुमचा फोन नंबर ट्रूकॉलर (Truecaller) मधून कसा काढायचा?
- ट्रूकॉलरच्या अधिकृत वेबसाइटवर जा.
- ट्रूकॉलरच्या अनलिस्ट फोन नंबर पेजवर नेव्हिगेट करा.
- देशाच्या कोडसह तुमचा फोन नंबर लिहा.
- तुम्हाला तुमचे ट्रूकॉलर अकाउंट डिॲक्टिव्हेट करायचे आहे, या पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर कॅप्चा कोड (captcha code) प्रविष्ट करा.
- त्यानंतर दिलेल्या पर्यायातून ‘अनलिस्ट’वर टॅप करा.
…या स्टेप्स फॉलो करून तुमच्या डिव्हाइसवरून तुमचे ट्रू कॉलर (Truecaller) अकाउंट डिलीट करू शकता आणि तुमचा फोन नंबर ट्रू कॉलर डेटाबेसमधून Unlisted असल्याची खात्री करून घेऊ शकता.