Hide Online Whatsapp Status : व्हॉट्सअॅपने या वर्षी युजर्ससाठी अनेक फीचर्स लाँच केलेत. डिलीट झालेला मेसेज परत मिळवण्यासाठी व्हॉट्सअॅपने अंडू फीचर सादर केला. ग्रुपवरील सदस्य मर्यादा १ हजारांवर केली. व्हिडिओ कॉलिगंमध्ये आता ३२ व्यक्ती सहभाग घेऊ शकतात. या वर्षातील सर्वोत्तम फीचर व्हॉट्सअॅपने लाँच केले ते म्हणजे ऑनलाइन स्टॅटस गुप्त ठेवण्याचा पर्याय.
हाइड ऑनलाइन स्टॅटस फीचर हे आता सर्व युजर्ससाठी उपलब्ध आहे. हे फीचर युजरला त्याचे ऑनलाइन स्टॅटस त्याला हवे असलेल्या कोणत्याही युजरपासून लपवू देते. युजरच्या इच्छेनुसार तो हे फीचर सुरू किंवा बंद करू शकतो. कुणालाही माहिती न पडू देता ऑलनाइन राहण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.
आणखी वाचा – आता Whatsapp वरून करता येणार कॅब बुक; फक्त ‘या’ नंबरवर पाठवा Hi; खूपच सोपी आहे ट्रिक्स
- पहिले व्हॉट्सअॅप अॅप अपडेट करा.
- आता व्हॉट्सअॅप उघडा आणि सेटिंग टॅबमध्ये जा.
- आता प्रायव्हसीमध्ये जा.
- आता लास्ट सीनवर टॅप करा आणि नंतर ऑनलाइन स्टॅटस पर्यायावर टॅप करा.
- विशिष्ठ युजरपासून स्वत:ची उपस्थिती लपवण्यासाठी नोबडी पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही सेम अॅज लास्ट सीन पर्यायावर क्लिक करू शकता.
आणखी वाचा – Save नसलेल्या नंबरवरही पाठवू शकता Whatsapp Message, फॉलो करा ‘या’ स्टेप्स
या फीचरद्वारे कुणालाही माहिती न होऊ देता युजर सहज ऑलनाइन राहू शकतो. तुम्ही व्हॉट्सअॅपवर कुणाच्या मेसेजेसकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असाल तेव्हा हे फीचर प्रामुख्याने मदत करते.