FIFA World Cup 2022: गूगल डूडलच्या माध्यमातून अनेक खास प्रसंगी, विविध क्षेत्रातील मान्यवरांना मानवंदना दिली जाते. तसेच अनेक आंतराष्ट्रीय उत्सव, खेळही डूडलवर साजरे होतात. यंदा कतारमध्ये सुरु असणाऱ्या फिफा विश्वचषकाच्या निमित्ताने गूगलने एका हटके पद्धतीने वापरकर्त्यांना खुश केले आहे . FIFA विश्वचषक २०२२ साठी गूगलतर्फे मिनी व्हर्जन रूपात Mini Cup हा ऑनलाईन गेम लाँच केला आहे. या ऍपमध्ये वापरकर्ते खेळण्यासह मुख्य फिफा विश्वचषकाविषयी, खेळाडूंबद्दल तपशीलवार माहिती मिळवू शकतात.

मिनी कप कसा खेळता येईल?

  • Google Chrome मधील “वर्ल्ड कप” टाइप करा
  • मिनी-गेम Android आणि iOS दोन्हीवर खेळला केला जाऊ शकतो.
  • तुम्हाला यामध्ये आगामी सामन्यांची माहिती आणि तळाशी उजव्या कोपऱ्यात निळ्या रंगाचा फुटबॉल दिसेल.
  • फुटबॉल टॅप केल्यावर तुम्हाला अॅनिमेटेड, रंगीबेरंगी स्क्रीनवर नेले जाईल जिथे तुम्ही तुमच्या आवडत्या सामन्यात तुमच्या आवडत्या संघासोबत “प्ले” करू शकता.
  • उदाहरणार्थ, तुम्ही अर्जेंटिना विरुद्ध सौदी अरेबिया मॅच कार्डच्या “प्ले” वर टॅप करता तेव्हा, तुम्हाला पुढील स्क्रीनवर नेले जाईल जेथे तुम्ही आवडत्या संघाच्या ध्वजावर टॅप करून त्या संघाचा भाग होऊ शकता.
  • आपण फुटबॉल नेटच्या दिशेने स्वाइप करून तुम्ही जितके गोल करू शकता तितके गोल करा. तुम्ही केलेले गोल जगभरातील चाहत्यांनी केलेल्या एकूण गोल संख्येमध्ये जोडले जातील.

हे ही वाचा << विश्लेषण: FIFA फुटबॉल वर्ल्डकप जिंकूनही विजेत्या संघाला ‘खरी’ ट्रॉफी मिळतच नाही! वाचा काय आहे या ट्रॉफीचा इतिहास?

दरम्यान, तुम्ही या फीचरसह एखाद्या विशिष्ट संघाच्या चाहत्यांनी किती गोल केले हे तपासू शकते. सध्या, अर्जेंटिना संघ जगभरातील चाहत्यांनी केलेल्या सर्वाधिक गोलांसह चार्टमध्ये आघाडीवर आहे.

Story img Loader