FIFA World Cup 2022 Qatar App : कतारमध्ये FIFA World Cup 2022 ची सुरुवात झाली आहे. देश विदेशातील फुटबॉलचे अनेक चाहते या विश्वचषक स्पर्धेची वाट पाहत होते. ही प्रतीक्षा संपली असून आता लोकांना आपल्या आवडत्या खेळाडूंना किंवा संघांना जेतेपद मिळवण्यासाठी संघर्ष करताना पाहता येणार आहे. परंतु, अनेक लोकांना कतारमध्ये जाऊन या स्पर्धेचे साक्षिदार होणे शक्य नसते. ऑफीसची कामे, शिक्षण, इत्यादी कारणांमुळे हे शक्य होत नाही. ज्या लोकांना जाणे शक्य नाही ते टीव्ही किंवा मोबाईलवर ही स्पर्धा पाहू शकतात. याच्याही एक पाऊल पुढे जाऊन तुम्हाला तुमच्या आवडत्या खेळाडूंबाबत, संघाबाबत, आगामी सामने, दुर्घटना, खेळाडूंच्या रेकॉर्डबाबत इत्थंभूत माहिती हवी असेल तर काही फुटबॉल ट्रॅकिंग अ‍ॅप्स तुम्हाला मदत करू शकतात. हे अ‍ॅप्स फिफा विश्वचषक स्पर्धेचा तुमचा अनुभव वाढवू शकतात. आज आपण या अ‍ॅप्सबाबत माहिती जाणून घेऊया.

१) फॅटमोब

Bluetooth 6.0 introduces channel sounding
Bluetooth 6.0 लेटेस्ट व्हर्जन, ऑडिओ, व्हिडीओ ते डॉक्युमेंट्स शेअर करण्याची असणार सोय; कोणत्या फोन, डिव्हाईसमध्ये चालेल?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
icc cancels november 11 due to bcci and pcb fight over champions trophy schedule
चॅम्पियन्स करंडकाबाबत संभ्रमच! वेळापत्रक घोषणेचा आजचा कार्यक्रम ‘आयसीसी’कडून रद्द
11th November November Horoscope In Marathi
११ नोव्हेंबर पंचांग: इच्छापूर्ती, मेहनतीला यश ते व्यापारात फायदा; तुमच्या आठवड्याची सुरुवात कशी होणार? वाचा तुमचे राशिभविष्य
IND vs SA Ryan Rickelton's 104 Metre Six man ran away with ball video viral
IND vs SA सामन्यात रायन रिकेल्टनने हार्दिक पंड्याला षटकार मारताच प्रेक्षकाने केलं असं काही की… VIDEO होतोय व्हायरल
New Maruti Suzuki Dzire earns 5-star rating in Global NCAP safety test Delivers 25.71 Kmpl 2024 Maruti Dzire features and engine
New Maruti Suzuki Dzire: मारुतीने केली सगळ्यांची बोलती बंद! लॉंच होण्यापूर्वीच डिझायरला मिळालं ५-स्टार ग्लोबल NCAP रेटिंग
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य

फॅटमोब अ‍ॅपमध्ये प्रवेश करताना तुमचे आवडते खेळाडू, संघ यांना निवडण्याचा पर्याय दिला जातो. त्यानंतर निवडलेल्या खेळाडू, संघाबाबत हे अ‍ॅप सर्व माहिती देते. अ‍ॅप तुम्हाला स्कोअर, दुखापतीबाबत आणि आगामी सामन्यांबाबतही माहिती देते. फॅटमॉब होमस्क्रिनवर लावण्यासाठी विजगेटही देते. यातून तुम्ही सामने आणि खेळाडूंबाबात माहिती मिळवू शकता.

(5G फोन हवा आहे, पण बजेट केवळ १५ हजार? मग ‘हे’ 3 आकर्षक फोन ठरू शकतात चांगले पर्याय)

२) गुगल सर्च

गुगल सर्च अ‍ॅपमधील विशेष स्पोर्ट संबंधी फीचरने तुम्हाला तुमच्या आवडत्या संघांचा मागोवा घेता येते. बातम्यांच्या माध्यामातून हे अ‍ॅप तुम्हाला अपडेटेड ठेवते. आवडता खेळाडू किंवा संघाबाबत माहिती मिळवण्यासाठी तुम्हाला संर्च करावे लागेल. आवडत्या सामान्याचा स्कोअर जाणून घेण्यासाठी तुम्ही होमपेजला लाईव्ह मॅच स्कोअर पीन करू शकता.

३) फिफा प्लस

अधिृकत, विश्वासार्ह माहिती मिळण्यासाठी फिफा प्लस अ‍ॅप चांगला पर्याय आहे. या अपॅद्वारे तुम्हाला खेळाडू, संघ आणि सामन्यांबाबत विश्वासार्ह माहिती मिळू शकते. तुम्ही मॅच पाहत नसाल तरी तुमचे मनोरंजन होऊ शकते. अ‍ॅपमध्ये बरेच ओरिजिनल कंटेट मिळत असून अ‍ॅपचे स्वत:चे फॅन्टसी गेम देखील आहे.

(युजरशिवाय इतर कोणीही चॅट्स पाहू शकणार नाहीत, व्हॉट्सअ‍ॅप ‘या’ फीचरवर करतंय काम)

४) वर्ल्ड फुटबॉल स्कोअर

यादीतील हे सर्वात सोपे अ‍ॅप आहे. वर्ल्ड फुटबॉल स्कोअर तुम्हाला तुमचा आवडता खेळाडू किंवा संघ निवडण्याबाबत विचारत नाही. संपूर्ण स्पर्धेबाबत हे अ‍ॅप माहिती देते. सामने, गट सारण्या, बातम्यांसाठी मुख्य स्क्रीनवर टॅब्स देण्यात आले आहेत. सेटिंग्समध्ये गेल्यास काही निवडक संघांबाबतचे पुश नोटिफिकेशन तुम्ही सुरू किंवा बंद करू शकता.

५) वन फुटबॉल

वन फुटबॉल अ‍ॅप वर्ल्ड कप, यूईएफए चॅम्पियन लिग आणि इतर स्पर्धांबाबतही आढावा देते. हे अ‍ॅप तुम्हाला अँड्रॉइड होमस्क्रिनसाठी एक विजगेट देते. या विजगेटद्वारे तुम्ही सामान्याबाबत माहिती मिळवू शकता.